💥सेलू येथील बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन...!


💥अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोरात-कठोर पाऊले उचलण्याची केली मागणी💥

परभणी (दि.०९ सप्टेंबर) - डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवक संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांना सेलू येथे झालेल्या मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले.

सेलू येथे १० वर्षाच्या चिमुकलीवर  दोन नराधमांकडून बलात्कार करण्यात आला त्यांना कठोरात-कठोर शिक्षा करण्यात यावी तसेच माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, महिन्याभरात असे अनेक प्रकरणे देशात आणि राज्यात घडतांना आढळत असून यावर कठोर पाऊले उचलली जात नाहीत. म्हणूनच की काय या नराधमांना रान मोकळं वाटत आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोरात-कठोर पाऊले उचलावीत अशी विनंती संघटनेकडून करण्यात आली. या निवेदनावर जिल्हाउपाध्यक्ष क्रांती बुरखुंडे, जिल्हाउपाध्यक्ष अमन जोंधळे, जिल्हाकोषाध्यक्ष जय एंगडे, किरण खंदारे, सुबोध खंदारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या