💥मटकऱ्हाळा येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....!


💥आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद💥

परभणी (दि.११ सप्टेंबर) - प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या वाढदिवसा निमित्त प्रहार जनशक्ती पक्ष शाखा मटकऱ्हाळा च्या वतीने सर्व   रोगाच्या निदानाचे आरोग्य तपासणी शिबीर गावातील जिल्हा परिषद शाळा येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास गावातील वृद्ध, महिला व तरुण नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत एकूण ३४२ नागरिकांनी आपली मोफत वैद्यकीय तपासणी व औषोपचार करून घेतला. गावकर्यांनी सकाळ पासूनच या शिबिरासाठी चांगला प्रतिसाद दिला. पाउस सुरु असतांना देखील शिबिरा ठिकाणी लांबच लांब रंगा दिसून येत होत्या. अयोजकांनी शिबिरास येणाऱ्या गावकर्यांसाठी चांगली व्यवस्था केली होती.


प्रचलित राजकीय व्यवस्थेला फाटा देत बॅनरबाजी व जाहिरातबाजी न करता समाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागातील जनतेला चांगली आरोग्य सुविधा मिळावी या साठी आरोग्य शिबिराचे आयोजन करून समाजिक बांधिलकीचा वेगळा पायंडा पाडण्याचा स्तुत्य प्रयत्न केला.

आरोग्य शिबिरास डॉ.अंगद बोबडे समुदाय आरोग्य अधिकारी, संबर डॉ.अशोक सूर्यतळ, समुदाय अधिकारी मांडवा, ओमप्रकाश देशमुख एमपीडब्यू, समीउल्लाह खान आरोग्य सहाय्यक, संगीता तालेवार पारिचारिका, गीता गरुड आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांनी वैद्यकीय सुविधा पुरवली.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला त्या नंतर उपस्थित गावकर्यांना जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन हनुमान गरुड यांनी केले.

कार्यक्रमाला प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, तालुका प्रमुख ज्ञानोबा काळे, शहर प्रमुख धर्मेंद्र तुपसमूद्रे, शहर चिटणीस वैभव संघई यांच्या सह शिवाजीराव गरुड टेलर, भगवतराव गरुड पाटील, रामराव गरुड, उद्धव गरुड, माऊली गरुड, विठ्ठल गरुड, ओमकर गरुड, हनुमान गरुड, कृष्णा गरुड, सतीश गरुड, प्रताप गरुड इत्यादी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या