💥दिल्ली विधासभेचे आमदार दिनेश मोहनिया त्यांच्या प्रयत्नाने मराठवाड्यातील अपघात ग्रस्त कार्यकर्त्याला उपचारासाठी मदत...!
💥परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी आ.मोहनिया यांच्याशी संपर्क साधून मिळवून दिली मदत💥

प्रतिनिधी परभणी

आम आदमी पार्टीचे मराठवाडा सचिव अनिल ढवळे यांचा दिल्लीत दोन दिवसापूर्वी अपघात झाला. सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या विनंतीवरून दिल्लीच्या आमदार दिनेश मोहनिया यांनी या कार्यकर्त्यावर उपचार मिळवून देण्यासाठी अपोलो हॉस्पिटल प्रशासनाला सूचना केल्या.

 जालना जिल्ह्यातील रहिवासी असलेले आणि मराठवाड्याचे आम आदमी पार्टीचे सचिव अनिल ढवळे हे दोन दिवसापूर्वी दिल्ली येथे पक्षाच्या बैठकीसाठी गेले होते .दिल्लीत पाई चालत असताना अचानक आलेल्या वाहनाने धडक दिली. त्यात त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. सोबतच्या कार्यकर्त्यांनी त्यांना खाजगी दवाखान्यात उपचारासाठी हलवले. त्या ठिकाणी पाहिजे तसे उपचार होत नसल्याची माहिती सोशल मीडिया द्वारे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांना मिळाली. यावरून त्यांनी दिल्लीचे पंधरा वर्षापासून आमदार असलेले, दिल्ली जल आयोगाचे अध्यक्ष, उत्तरांचल प्रभारी आमदार दिनेश मोहनिया यांच्याशी संवाद साधून या कार्यकर्त्यावर उपचार करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती केली. आमदार मोहनिया यांनी थेट अपोलो हॉस्पिटल शी संपर्क साधून या कार्यकर्त्याला योग्य उपचार मिळावेत यासाठी हॉस्पिटल प्रशासनाला सूचना केल्या. कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांनी आमदार दिनेश मोहनिया व आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांचे आभार मानले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या