💥बेस्ट बसेसवरील भाजपच्या किळसवाण्या जाहिरातबाजीचे फोटो पाहिले आणि मग हे सगळं लिहावंसं वाटलं - देवा पाटील


💥त्यांच्याशी कृतघ्न न होता जे काही त्यांनी आपल्यासाठी केलं ते स्मरणात ठेवायला हवं💥

✍🏻लेखक :- देवा पाटील परभणी


देशात कुठे नदीच्या पात्रात मृत शरीरांचा खच पाण्यावर तरंगत होता तर कुठे प्रेतं जाळून जाळून उष्णतेने स्मशानाच्या चिमण्या वितळत होत्या,त्या भीषण काळात हा माणूस आपल्या राज्यात तशी भयावह परिस्थिती उद्भवू नये म्हणून डोळ्यात तेल घालून सगळ्या दक्षता घेत होता.स्वतःच्या राज्यातील जनतेला सतत धीर देतानाच परराज्यातील येथील गोरगरिबांनीही इथेच राहावं,त्यांची सगळी काळजी घेऊ असं कळकळीचं आवाहन करीत होता.

कुठे ऑक्सिजन कमी पडू नये,कुठे अन्य वैद्यकीय सामुग्रीचा तुटवडा भासू नये,डॉक्टर आणि आरोग्य सेवकांचं मानसिक खच्चीकरण होऊ नये म्हणून सतत शक्य ती सारी काळजी घेत होता.अनेकांचा वाईटपणा घेऊनही जोवर सारी परिस्थिती नियंत्रणात येत नाही तोवर शाळा,सर्वधर्मीय मंदिरं उघडणार नाही असा आग्रह धरून होता.आपल्या राज्यातील जनतेला सुरक्षित राखण्यासाठी दोन-तीन टास्क फोर्स निर्माण करणारा हा एकमेव मुख्यमंत्री होता.या सगळ्या प्रयत्नांमुळेच आपलं हे राज्यच अन्य काही राज्यांप्रमाणे स्मशानघाट बनलं नाही.अनेक मृत्यू जरूर झाले..परंतु कुठे त्यात नागरिकांच्या मनातील प्रचंड भीती,काही ठिकाणी हलगर्जीपणा कारणीभूत होता तर कुठे प्रयत्नांची शर्थ करूनही आलेली ती वेदनादायी अपरिहार्यता होती. दिल्ली, गुजरात, उत्तरप्रदेश,बिहारमध्ये माणसं उपचारांअभावी रस्त्यांवर तडफडून मरताना सलग दिसली तशी भीषण दृश्य आपल्याकडे क्वचितच कुठे दिसली असतील.त्या सगळ्याचं श्रेय राज्याचा मुख्यमंत्री म्हणून या उद्धव ठाकरेंचं होतं.अर्थात तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे,उपमुख्यमंत्री अजितदादा आदींचेही त्यात योगदान होतेच.आज आपण सगळे सण-उत्सव उत्साहात आणि जल्लोषात साजरे करू शकतोय त्यापाठी त्यांचं नियोजन,दूरदृष्टी आणि परिश्रम आहेत.

त्या भीषण काळात जी मंडळी शाळा उघडा,मंदिरं उघडा वगैरे रोज वेगवेगळ्या मागण्या करून जनतेला भडकवण्याचा आणि त्या सहृदयी,संवेदनशील मुख्यमंत्र्यांना अडचणीत टाकण्याचा घाणेरडा राजकीय खेळ करीत होते तेच लोक आज स्वार्थी जाहिरातबाजीत गुंतलेत.त्यांचं सोडा..स्वार्थी आणि घाणेरडं,विकृत राजकारण हा त्यांचा धंदा आहे,पण आपण..या राज्यातील सुजाण जनतेने,उद्धव ठाकरे यांनी त्या अतिशय प्रतिकूल काळात आपल्या रक्षणासाठी,आपल्या हितासाठी केलेले सर्व प्रयत्न कायम लक्षात ठेवायला हवेत.त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही लोकांसारखं आपण त्यांच्याशी कृतघ्न न होता जे काही त्यांनी आपल्यासाठी केलं ते स्मरणात ठेवायला हवं..

(बेस्ट बसेसवरील भाजपच्या किळसवाण्या जाहिरातबाजीचे फोटो पाहिले आणि मग हे सगळं लिहावंसं वाटलं..)

जय महाराष्ट्र आपला संघर्ष योध्दा देवा पाटील परभणी विधानसभा मतदारसंघ....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या