💥पूर्णा शहर काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष पदावर शेख अहेमद शेख मस्तान यांची निवड...!


💥परभणी जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ.सुरेशराव वरपुडकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान💥

पुर्णा (दि.०७ सप्टेंबर) - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पुर्णा शहराध्यक्षपदावर नुकतीच रेल्वेचे सेवानिवृत्त ड्रायव्हर शेख अहेमद शेख मस्तान यांची निवड करण्यात आली असून त्यांना काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ.सुरेशराव वरपुडकर (माजी राज्यमंत्री) यांच्या हस्ते व जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष वहीद कुरेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत  नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. 

या वेळी पुर्णा तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.संजय लोलगे,रंगनाथ भोसले माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती,विश्वनाथ शिंदे आदि उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या