💥मंत्रालय मुंबई येथील संघटनेच्या केंद्रीय राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये घेण्यात आले महत्त्वपुर्ण निर्णय....!


💥या बैठकीमध्ये मागासवर्गीयांच्या पदोन्नतीच्या आरक्षणाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली💥

संघटनेचे राज्याध्यक्ष  मा.भारत वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जाती/ जमाती/ वि.जा.-भज/इ.मा.व./वि.मा.प्र. शासकीय- निमशासकीय अधिकारी-कर्मचारी संघटना मंत्रालय, महाराष्ट्र राज्य* या संघटनेची मंत्रालय येथे केंद्रीय राज्य कार्यकारिणीची बैठक दि.२.९.२०२२ रोजी संपन्न झाली. 

        सदरच्या बैठकीस सुभाष गवई , राज्य कार्याध्यक्ष तथा वरिष्ठ स्वीय सहाय्यक, महसूल विभाग व डॉ. उत्तमराव सोनकांबळे राज्य महासचिव, भास्कर बनसोडे राज्य उपाध्यक्ष तथा कक्ष अधिकारी सा .बा वि., विजय नांदेकर , राज्य उपाध्यक्ष तथा कक्ष अधिकारी सा.प्र. विभाग, अनुज निखारे, राज्य कोषाध्यक्ष तथा कक्ष अधिकारी महसूल विभाग , राज्याचे ग्राम विकास विभागाचे उपसचिव मनोज जाधव ,उपसचिव रवी गिरी, सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव राजेंद्र सवने, लक्ष्मण धुळेकर-लेखाधिकारी राज्य निवडणूक आयोग, पराग पाटील - उपसंचालक शालेय शिक्षण, संघटनेच्या बेस्ट शाखेचे अध्यक्ष तथा प्रशासकीय अधिकारी राजेश साळुंखे, प्रमोद चौधरी कार्यासन अधिकारी, देवदत्त राऊत-कक्ष अधिकारी, राजू निखारे-कक्ष अधिकारी, देवीसिंग दाबेराव-कक्ष अधिकारी तसेच इतर अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. 

             या बैठकीमध्ये मागासवर्गीयांच्या पदोन्नतीच्या आरक्षणाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली.  तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नव -नियुक्तीच्या संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. संघटनेच्या राज्य महिला शाखेच्या अध्यक्ष  या पदावर सिडकोच्या श्रीमती सविता वैभव शिंदे तर राज्याच्या महिला महासचिव या पदावर  सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय, मुंबई येथील कक्ष अधिकारी श्रीमती मंगल नाखवा यांची नियुक्ती करण्याचा निर्णय संघटनेच्या केंद्रीय राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सर्वानुमते घेण्यात आला.तसेच त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन  राज्याध्यक्ष मा.भारत वानखेडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.   

      यावर नवनियुक्त राज्य महिला शाखेच्या अध्यक्षा सविता शिंदे यांनी पुढीप्रमाणे आपले मनोगत व्यक्त  केले, समस्त बहुजन अधिकारी कर्मचाऱ्यांचे सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक प्रश्न अडी-अडचणी संविधानिक मार्गाने सोडवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार,  असे कोणतेही क्षेत्र नाही जेथे स्त्रीया नाही, त्या आर्थिक सामाजिक सक्षम झाल्या तरी काही महिला स्वावलंबी झालेल्या नाहीत. महिलांनी आत्मनिर्भर होऊन स्वतःचे उद्दिष्ट गाठावे. घर समाजात स्वतःचे स्थान निर्माण करावे याबाबत संघटनेचे राज्याध्यक्ष मा. भारत वानखेडे  साहेब नेहमीच मार्गदर्शन करत असतात. 

महिलांना संधी उपलब्ध करून दिली तर लोकशाही अधिक बळकट होईल. आज या संघटनेच्या राज्याच्या केंद्रीय कार्यकारणी मध्ये महिलांना महत्त्वाचे व प्रतिष्ठित पद देऊन त्यांनी नारीशक्तीचा सन्मान केला आहे तसेच महाराष्ट्रातील महापुरुषांच्या विचारधारेशी एकरूप होऊन संविधानाला पाईक असलेल्या संघटनेमध्ये समाविष्ट केल्या बद्दल  संघटनेचे आभार व्यक्त केले श्रीमती मंगल नाखवा यांनी, निर्भिडपणे महिला कर्मचारी,अधिकारी यांच्या समस्यांविषयी त्यांना  न्याय देण्याचे काम मी जोमाने करेन असे प्रतिपादन केले.

        तदनंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या भुमिअभीलेख विभागातील तांत्रिक वेतन श्रेणी, बेस्ट विभागातील पदोन्नती व सेवा विषयक बाबी आणि वन विभाग तसेच राज्यातील इतर विभागातील सेवा विषयक  प्रश्न सोडविण्यासाठी संघटना प्रयत्नांची पराकाष्ठा करेल याबाबत एकमत झाले.

कार्यक्रम शेवटी मा.अनुज निखारे ,राज्य कोषाध्यक्ष यांचे चिरंजीव कु.अविनाश निखारे हे उच्च शिक्षणासाठी * ब्रिटन येथे जात असल्यामुळे श्री. अनुज निखारे यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच त्याच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या