💥शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखालील आदोलनाला सुरुवात होण्यापुर्वीच रेल्वे प्रशासनाने मागण्या केल्या मान्य....!


💥रेल्वेचे विभागीय प्रबंधक उपिंदर सिंग यांनी खासदारांशी चर्चा करून मागण्या मान्य असल्याचे घोषित केल्यानंतर आंदोलन मागे💥 

परभणी (दि.१७ सप्टेंबर) - परभणी रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचे विविध प्रश्न, जिल्ह्या अंतर्गत रेल्वेच्या प्रश्नांवर आज शनिवार दि.१७ सप्टेंबर रोजी परभणी रेल्वे स्थानकात रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची तिव्रता पाहून रेल्वेचे विभागीय प्रबंधक उपिंदर सिंग यांनी खासदारांशी चर्चा करून मागण्या मान्य असल्याचे घोषित केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.


या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत रेल्वे स्थानकात प्रवेश केला व आंदोलनास सुरुवात झाली. घोषणाबाजी करत सचखंड रेल्वेला रोखण्यासाठी रेल्वे स्थानकाला घेराव घातलेल्या शिवसैनिकांना खासदार संजय जाधव, डिआरएम सिंग यांनी संबोधित केले. रेल्वे रोखण्यासाठी शिवसैनिकांनी आक्रमक पावित्रा घेतला.  शिवसैनिकांची प्रचंड गर्दी पाहूण रेल्वेचे विभागीय प्रबंधक उपिंदर सिंग यांनी खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहूल पाटील, डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्याशी चर्चा केली. रेल्वे उड्डाणपुलाची प्रलंबीत कामे, प्रवाशांसाठी वातानुकूलीत वेटींग हॉल,परभणी येथे रेल्वे सुरक्षाबलाची संख्या वाढवावी, स्थानकातील अनाधिकृत अ‍ॅटोंची घुसखोरी थांबवावी, पूर्णा येथील सिध्दार्थ नगर ते बौध्द विहार हा पादचारी पुल करावा,

परभणी शहरातील साखला प्लॉट येथील भुयारी मार्ग हे प्रश्न व रेल्वेस्थानकातील प्रवाशांच्या सुविधेशी निगडीत इतर प्रश्न त्यांच्या समोर मांडले. यावर रेल्वेचे विभागीय प्रबंधक उपिंदर सिंग यांनी मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन दिले या चर्चेनंतर संचखंड रेल्वे रोखण्यासाठी रेल्वे रुळावर उतरण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवसैनिकांना थांबवले. या प्रसंगी शिवसैनिकांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम,माजी जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आणेराव, सदाशिव देशमुख, मधुकर निर्पणे,दिपक बाराहाते,अतुल सरोदे, रविंद्र धर्मे, सुधाकर खराटे, युवा सेना जिल्हा प्रमुख अर्जून सामाले, विशाल भोसले, संतोष एकलारे,डॉ. उपगुप्त महास्थविर, भदंत मुदितानंद, भंते पय्यावांश, उत्तम खंदारे, ॲड.हर्षवर्धन गायकवाड, ॲड. धम्मा जोंधळे अनिल सातपुते, काशिनाथ काळबांडे, रंजित गजमल, दिलीप आवचार, पप्पू वाघ, गोकुळ लोखंडे,नितीन कदम, तालुकाप्रमुख पायघन, भगवान धस, रावसाहेब रेंगे, रामप्रसाद रणेर, प्रदिप भालेराव, शिवम पास्टे, तुफान सिंग,  संजय सारणीकर,संतोष कांबळे, अभिजीत मुंढे, दिपक मुरारी, व्यंकट डहाळे, अण्णा डिघोळे, अविनाश कांबळे, नारायण पारखे, मुकेश रफिक, झेलसिंग बावरी, शिवा रंगे, अमोल कुलथे, सतिश नारवाणी, सोनू पवार, सचिन जोगदंड, संताोष मोरे, संदिप देशमुख, सचिन भोजने, विक्की पास्टे,  विजयसिंग ठाकुर, प्रल्हाद चव्हाण, विशाळ तळेकर, सुभाष जोंधळे,विरु बांगर, रवि नेटके, सोमनाथ धोते, अरबाज शेख, पिराजी नांदखेडकर, अर्जुन रणेर, विजु भालेराव, मनोज पिल्ले, नदीम लाला, कबीर भाई, जितेश गोरे, कृष्णा पिंगळे, दिलीप अंभोरे, सुरेश मगरे, मानवत येथील किशन शिंदे, मनोज भिसे, रौफ कुरेशी, दादाराव पंडित, सचिन यंदे, सचिन मोटे यांच्यासह  मोठ्या संख्येने  जिल्हाभरातील शिवसैनिक उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या