💥वर्तमान काळातील कुशल कर्म शाश्वत सुखाकडे घेऊन जात असतात....!


💥भदंत धम्म ज्योती थेरो यांचे प्रतिपादन💥

पूर्णा (दि.11 सप्टेंबर) - बुद्ध विहार पूर्णा या ठिकाणी भाद्रपद पौर्णिमेनिमित्त अखिल भारतीय भिखु संघाचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव भदंत डॉक्टर उप गुप्त महा थे रो यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख मार्गदर्शनाखाली धम्म देश ना व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी अखिल भारतीय संघाचे महाराष्ट्र राज्याचे सहसचिव धम्म ज्योती थेरो औरंगाबाद पूर्णा येथील भदंत पयावंश यांची  उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे व सत्कारमूर्ती आनंद अजमेरा विशाल चितलांगे मिलिंद कांबळे हे होते.

आपल्या प्रमुख धम्मदेशनेमध्ये भदंत धम्म ज्योती थे रो यांनी बुद्ध तत्त्वज्ञानावर अभ्यासपूर्ण पूर्ण प्रवचनामध्ये प्रकाश टाकताना सांगितले अखिल मानव जातीचे कल्याण कुशल कर्माने होऊ शकते.


वर्तमान काळातील सातत्यपूर्ण कुशल कर्म मानवाला शाश्वत सुखाकडे घेऊन जात असतात पूर्णा येथील प्रथित यश व्यापारी विशाल चितलांगे यांनी पूर्णा येथील बुद्ध विहार समाजप्रबोधनाच आदर्श केंद्र आहे. वंदनीय डॉक्टर उप गुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली विहारांमध्ये विशुद्ध स्वरूपामध्ये धम्माचे ज्ञान मिळत असते.मनशांतीसाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे असे मला वाटते.

आपल्या प्रमुख धम्म देशने मध्ये भदंत डॉ उप गुप्त महा थे रो यानी अखिल मानव जातीचे कल्याण महामानव भगवान बुद्ध यांना अभिप्रेत होते त्रिपिटका मध्ये जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मानव जातीच्या कल्याणाचा विचार केला आहे . पाली भाषा ही सुविचाराची भाषा आहे.


त्यामध्ये कोणत्याही गोष्टी निरर्थक नाही कार्यक्रमास रिपाई नेते सुप्रसिद्ध आंबेडकर विचारवंत प्रकाश कांबळे माजी उपनगराध्यक्ष गटनेते उत्तम भैया खंदारे नगरसेवक हर्षवर्धन गायकवाड मुकुंद भोळे माजी नगरसेवक अशोक धबाले यांची उपस्थिती होती काल कथित बालासाहेब अजमेरा यांच्या स्मरणार्थ आनंद अजमेरा यांनी उपस्थितांना खीर दान दिले.

यावेळी मराठवाड्यातील विविध ठिकाणाहून महिला मंडळाचे पदाधिकारी व बौद्ध उपासक उपासकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशस्वी करण्यासाठी  बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे दिलीप गायकवाड वारा काळे विजय जोंधळे पीजी रणवीर शिवाजी थोरात टी.झेड.कांबळे राम भालेराव सुरज जोंधळे प्रकाश जगताप नितीन सोनुले सोनू काळे आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या