💥जिंतूर शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाद्वारे सायकलवर गस्त.....!


💥गस्तीदरम्यान गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना प्रबोधन💥

 जिंतूर प्रतिनिधी / बि.डी. रामपूरकर

जिंतूर शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भयमुक्त वातावरणाची निर्मिती करण्यासाठी आणि गणेश भक्तांच्या आनंदावर कोठेही बाधा निर्माण होऊ नये यासाठी पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांनी  सायंकाळी 7 वाजता सहकाऱ्यांना सोबत घेऊन चक्क सायकलवर संपूर्ण शहरात गस्त घालून गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना प्रबोधन केले.

               हिंदू धर्मियांचे आराध्यदैवत लाडक्या गणरायाचे ढोल ताश्यांच्या गजरात आगमन झाले आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे शासनाच्या वतीने सार्वजनिकरित्या गणेशोत्सव साजरा करण्यास निर्बंध होते पण यावर्षी निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे तब्बल दोन वर्षानंतर गणेश भक्तांनी मोठ्या हर्षोल्हासाने लाडक्या गणरायाचे स्वागत केले. अशा स्थितीत कोठेही भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये संपूर्ण गणेशोत्सव भयमुक्त साजरा व्हावा यासाठी पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांनी शहरात चोख बंदोबस्त उभा केला आहे. सोबतच गणेशोत्सवात चालणारे अवैध धंदे आणि विकृत मनोवृत्तीच्या इसमाच्या हालचालींवर सूक्ष्म नजर ठेवण्याकरिता पोउपनि खोले, पोउपनि कोकाटे, महिला पोउपनि निता कदम, पोलीस हवालदार शिंदे, घोडके आदींनी सोबत घेऊन चक्क सायकलवर संपूर्ण शहरात गस्त घातली. गस्तीदरम्यान शहरातील गणेश मंडळांना भेटी देऊन कायदा व सुव्यवस्थे संदर्भात प्रबोधन ही केले. यावेळी जिंतूर रन्डोनिअर्स सायकल क्लबचे व्यंकटेश भुरे, प्रा अनिल संगवई, आकाश अग्रवाल, रियाज चाऊस, पवन कालापाड, आकाश अग्रवाल आदींनी ही रॅलीत सहभाग नोंदवला होता.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या