💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या हेडलाईन्स.....!


💥संजय राऊत यांचा जेलमधील मुक्काम वाढला,कोठडी 14 दिवसांनी वाढली💥

✍️ मोहन चौकेकर

1. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर, राष्ट्रवादी आणि भाजपची सरशी, काँग्रेसची पिछेहाट 

2. संजय राऊत यांचा जेलमधील मुक्काम वाढला,कोठडी 14 दिवसांनी वाढली ; पत्राचाळ घोटाळ्यातील मास्टरमाईंड संजय राऊतच, आरोपपत्रात ईडीचा दावा 

3. सणासुदीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संक्रांत? शिंदे सरकारच्या निर्णयामुळे महामंडळ पेचात 

4. विदर्भातील जनतेला वेगळा विदर्भ हवा असेल तरच वेगळ्या विदर्भाचा निर्णय घ्यावा.. वेगळ्या विदर्भासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरे यांचं उत्तर ; राज्यात आलेला उद्योग बाहेर जातोच कसा? फॉक्सकॉन प्रकरणाची चौकशी व्हावी; राज ठाकरेंचा हल्लाबोल 

5. शिवसेना दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कची जागा नाकारली तर कोर्टात जाण्याची तयारी, महापालिकेने प्रलंबित अर्जावर उत्तर देण्यास आणखी उशीर केला तर मैदानात उतरुन प्रत्युत्तर देण्याचा इशारा ; 'शिवाजी पार्क म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे गणित' दसरा मेळाव्याच्या वादावर शरद पवारांची प्रतिक्रिया

6. मंत्री संजय राठोड यांना शह देण्यासाठी शिवसेनेची मोठी खेळी, बंजारा समाजाचे तीन महंत शिवबंधन बांधणार ?  यवतमाळ जिल्ह्यातील माजी राज्यमंत्री संजय देशमुख शिवसेनेच्या वाटेवर! मंत्री संजय राठोडांना शह देण्यासाठी सेना नेतृत्वाची रणनिती 

7. पक्षातील लोकांनीच कारस्थान करून मुख्यमंत्रीपदावरून हटवले; ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचा निशाणा 

8. बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणात डॉक्टरचा शोध घेताना बुडालेल्या कोल्हापूरच्या जवानाचाही मृत्यू, मच्छिमारांच्या जाळ्यात अडकल्याने करूण अंत 

9. अरेच्चा हे काय... यंदा पुरुषोत्तम करंडकाचा मान कोणालाच नाही! कंरडकाच्या योग्यतेची एकांकिका आणि अभिनय सादर झाला नसल्याचा परीक्षक मंडळाचा दावा ; 'दर्जेदार एकांकिका नाहीत म्हणून स्पर्धा होणार नाही असं जाहीर करून टाकावं'; दिग्दर्शक विजू माने यांनी व्यक्त केला संताप 

10. आज महाराणी एलिझाबेथ यांच्यावर अंत्यसंस्कार, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह अनेक देशांच्या प्रमुखांची अंत्यसंस्कारासाठी उपस्थिती 

11.धमदाईमध्ये धाकट्या भावाकडून मोठ्या भावाचा पराभव; कोळदामध्ये महिला उमेदवाराचा एका मताने विजय 

12.दिल्लीतील शेतकरी आंदोलनात माओवाद्यांचा शिरकाव; ' राज्यांत हातपाय पसरण्यासाठी प्रयत्न सुरू 

13.संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेची ग्रामपंचायतीत एन्ट्री, नाशिकमध्ये पहिला विजय 

14.पुण्यात 'राष्ट्रवादीच पुन्हा', 61 पैकी 30 ग्रामपंचायतींवर वर्चस्व, भाजपकडे तीन ग्रामपंचायती 

15.जळगावात भाजप-काँग्रेसला भोपळा! 13 पैकी एकही ग्रामपंचायत मिळाली नाही 

16.औरंगाबादच्या पिशोर भागात ढगफुटी सदृश पाऊस; सात गावांचा संपर्क तुटला 

17.Viral Video : विद्यार्थ्यानं गायलेल्या 'चंद्रा' लावणीनं नेटकऱ्यांना लावलं वेड; अमृता खानविलकरकडून कौतुक, व्हिडीओ तुफान व्हायरल 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या