💥पुर्णा येथील युवा कवी/लेखक दिपक पुर्णेकर यांच्या 'कोलदांडा' कथा संग्रह प्रकाशन सोहळ्याचे दि.११ सप्टेंबर रोजी आयोजन....!


💥कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दंगलकार नितिन चंदनशिवे तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून संतोष एकलारे यांची उपस्थिती💥 

पुर्णा (दि.०९ सप्टेंबर) - शहरातील युवा साहित्यिक कवी तथा लेखक दिपक पुर्णेकर यांनी लिखीत 'कोलदांडा' या कथा संग्रहाच्या भव्य प्रकाशन सोहळ्याचे आयोजन रविवार दि.११ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १०-०० वाजेच्या सुमारास जुना मोंढा परिसरातील गोंधळ सम्राट राजारामबापू कदम सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले असून या भव्य ग्रंथ प्रकाशन सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिध्द विद्रोही कवी 'दंगलकार' नितिनजी चंदनशिवे तर कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून शहरातील राजकीय क्षेत्रातले सर्वसमावेशक बहुजन नेतृत्व नगराध्यक्ष प्रतिनिधी मा.संतोष एकलारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


या भव्य ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे कार्याध्यक्ष म्हणून मा.नगरसेवक दादाराव पंडीत तर स्वागताध्यक्ष म्हणून परभणी जिल्हा मानवहीत लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड हे राहणार असून या भव्य ग्रंथ प्रकाशन सोहळ्यास रिपाईचे जेष्ठ नेते तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रकाशदादा कांबळे,पुर्णा पोलिस स्थानकाचे पो.नि.सुभाष मारकड,लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्रजी भराडे,लालसेनेचे संस्थापक अध्यक्ष गणपत भिसे,माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक उत्तमभैया खंदारे,नगरसेवक ॲड. धम्मदीप जोंधळे,मा.नगरसेवक मगदूम कुरेशी,नगरसेवक ॲड.राजेश भालेराव,मा.नगरसेवक देवराव खंदारे,जेष्ठ पत्रकार जगदीश जोगदंड,सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते राज नारायनकर, सामाजिक कार्यकर्ते मास्टर अनिल कांबळे,सलीम सौदागर,धम्मपाल निर्मले,मो.मुजफ्फर अ.खलीक,लक्ष्मीकांत शिंदे,मिलिंद कांबळे यांची विशेष उपस्थिती राहणार असून या भव्य ग्रंथ उदघाटन सोहळ्यास नागरिकांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भव्य ग्रंथ प्रकाशन सोहळा नियोजन समितीचे सुमित चावरे,अविनाश गायकवाड,पिराजी गायकवाड,आनंदराज जाधव यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या