💥जिंतूर शहरातील सडक सख्या हरींचा बंदोबस्त करण्यासाठी दामिनी पथक नियुक्त.....!


💥पोलीस उपनिरीक्षक नीता कदम यांची पथकाच्या प्रमुख म्हणून नियुक्त💥  

जिंतूर प्रतिनिधी/बी.डी. रामपूरकर

जिंतूर शहरात छेडछाडीची प्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने दामिनी पथक कार्यान्वीत केले असून महिला पोलीस अधिकाऱ्यासह सहा जणांचा या पथकात समावेश आहे. शहरातील अल्पवयीन मुली, महिला यांच्या सुरक्षितेचा प्रश्न 

शहरातील विविध शाळा महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी हजारो मुली येतात अनेकदा रोड रोमींकडून रस्त्याने ऐ-जा करणाऱ्या मुलींची छेड काढली जाते. तसेच ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी ऐ-जा करणाऱ्या मुलींची संख्या मोठी आहे. अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने सहा पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले आहे. त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक नीता कदम मो. नं  9922660412, पोलीस उपनिरीक्षक कोरके नं. 72 19 00 20 18, पोलीस उपनिरीक्षक सुलोचना गाडेकर न. 75  0 76 66 345, पोलीस हवालदार लीला जोगदंड न. 98 23 31 49 99, पोलीस शि. सोहेल न. 88 80 77 65 61, वपो.शि.थडवे न. 75 07 54 67 77. यांचे पथक कारणीत करण्यात आले आहे. दरम्यान या पथकातील तीन महिला व तीन  पुरुषांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

व शहरात महिला व मुली विषयी काही तक्रारी असल्यास संबंधित दामिनी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना फोनवर संपर्क करावा अशी माहिती जिंतूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांनी दिली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या