💥परभणी शहरातील कारेगांव रोडवरील ३७ वर्ष जुन्या क्रांती नगरात नागरी सुविधा अभाव....!


💥तात्काळ नागरी सुविधा पुरवा अन्यथा रहिवाशांनी आजपर्यंत भरलेल्या मालमत्ता कराची रक्कम व्याजासह परत द्या - प्रहार

💥जुन्या क्रांती नगरातील नागरिकांच्या हक्कासाठी प्रहार जनशक्ती पक्ष करणार मनपा विरोधात आंदोलन💥

परभणी (दि.२७ सप्टेंबर) - शहरात अंतर्गत येणाऱ्या कारेगांव रोडवरील क्रांती नगर तेथील प्लॉट एन ए ले आऊट झालेले असुन मागील ३७ वर्षांपासुन येथील नागरिकांनी न चुकता मालमत्ता कर दर वर्षी महानगरपालिकेला दिला शिवाय बेटरमेंट चार्जेस देखील दिले असे असतांनाही महानगरपालिका मात्र या नगरातील नागरिकांना आजपर्यंत एकही पक्का रस्ता, पक्के गटारे , पथदिवे, घंटा गाडी व स्वच्छतेच्या सुविधा देण्यास पुर्णपणे अपयशी ठरले आहे रस्ते नसल्याचे कारण देत आजपर्यंत या भागात घंटा गाडी आलीच नाही त्यामुळे नगरामध्ये मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत शिवाय पक्की गटारे नसल्याने सांडपाणी अनेक ठिकाणी जमा होऊन परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.


 महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या मालमत्ता धारकाने मालमत्ता कर व बेटरमेंट चार्जेस भरल्यास पक्के रस्ते, पथदिवे पक्की गटारे व घंटा गाडी यांच्यासह सर्व नागरी सुविधा देणे कायद्याने बंधनकारक आहे परंतु मागील ३७ वर्षांपासून या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना परभणी शहरमहानगरपालिकेने कुठल्याही नागरी सुविधा न दिल्याने महानगरपालिकेला मालमत्ता कर जमा करण्याचा कुठलाही अधिकार नाही. कारेगांव रोडवरील क्रांती नगर येथील रहिवाशांना रस्ते नसल्यामुळे चिखलामधुन ये - जा करावी लागते याबाबत आपण तात्काळ कार्यवाही करुन येत्या ८ दिवसांच्या आत येथील रहिवाशांना नागरी सुविधा देत रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावे, गटारे साफ करावे, पथदिवे बसवावे व येथे घंटा गाडी तात्काळ सुरु करण्यात यावी व असे न झाल्यास मागील ३७ वर्षांपासुन क्रांती नगर येथील रहिवाशांनी भरलेला मालमत्ता कर व्याज व शास्तीसह परत करावा या मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महानगर पालिकेच्या आयुक्तांना देण्यात आले.

वरील मागणी मान्य न झाल्यास प्रहार जनशक्ती व क्रांती नगर येथील नागरिकांच्या वतीने महानगरपालिका प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल व त्यावेळी उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत महानगरपालिका प्रशासन जबाबदार असेल याची नोंद घ्यावी असे ही या निवेदनात म्हंटले आहे निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी गजानन चोपडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख माधवीताई घोडके, शहर प्रमुख धर्मेंद्र तुपसमुद्रे, महिला आघाडी शहर प्रमुख आरतीताई जुमडे, शहर चिटनीस वैभव संघई, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर्, सय्यद युनूस, अंजलीताई काळे, नमिताताई पवार, संगीताताई आघाम, सुनिताताई पाटील, स्वातीताई हाके, सुमनताई लांडे, मंदाकिनीताई ढगे, सुवर्णाताई कदम, शोभाताई रनसिंग यांच्या सह १०० च्या वर महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या