💥परळीत आज वंचित बहुजन युवा आघाडीचि तातडीच्या बैठक संपन्न....!


💥वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष भगवंत आप्पा वायबसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न💥     


   
परळी (दि.०४ सप्टेंबर) - परळीत आज वंचित बहुजन युवा आघाडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते माहिती वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेश सरवदे व वंचित बहुजन युवा आघाडीचे परळी शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांनी दिली आहे.    


                                              याबाबत सविस्तर माहिती अशी की आज वंचित बहुजन युवा आघाडीची तातडीची बैठक शासकीय विश्रामगृह येथे दुपारी ठिक ०२-०० वाजता वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष भगवंत आप्पा वायबसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती या बैठकीत येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद सदस्य नोंदणी बुथ बांधणी शाखा बांधणी व स्थापना अश्या महत्वपूर्ण विषयाच्या अनुषंगाने अति तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस परळी तालुक्यातील व शहरातील वंचित बहुजन युवा आघाडीच्या सर्व पदाधिकाऱी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या