ळ💥जिंतूर तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याने तालुक्यातील नागरिक व शेतकरी भयभीत ?


💥बिबट्याने झाडाला बांधलेल्या गाईच्या दोन वासरावर हल्ला केला. यात दोन्ही वासरांचे प्राण गेले💥

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी. रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील दाभा शेतातील आखाडयावरील झाडाला बांधलेल्या आठ ते नऊ महिन्याच्या गायीच्या दोन वासरांचा बिबट्याने फडशा पाडल्याची घटना मंगळवार दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. ही घटना जिंतूर तालुक्यातील दाभा शेत शिवारात घडली असून यामुळे शेतकरी, गावकऱ्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परमेश्वर माणिकराव गिरे, द्रोपदी विठ्ठलराव सदावर्ते असे दाभा येथील वासरे असलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. सोमवारी रात्रीच्या सुमारास शेतातील आखाड्यावर कोणी नव्हते त्यामुळे बिबट्याने झाडाला बांधलेल्या गाईच्या दोन वासरावर हल्ला केला. यात दोन्ही वासरांचे प्राण गेले.


घटनास्थळी बिबट्याच्या पायाचे ठसे स्पष्ट दिसून येत असल्याची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली. वनपाल दुधारे यांनी 'दाभा येथील शेत शिवारातील घटनास्थळी जावून पंचनामा केला. यापूर्वी देखील वाघी वडी सर्कल व इतर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले असून अनेक जनावरे फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर पुन्हा दोन वासरांचा बिबट्याने जीव घेतला असल्याने जिंतूर तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये मितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने या बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांमधून करण्यात येत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या