💥बोरीत भगवंतांच्या मिरवणुकीने दशलक्षण पर्व उत्साहात साजरा....!


💥दररोज सकाळी अभिषेक,पूजा,आरती सायंकाळी आरती,प्रवचन व भजनाचे कार्यक्रम दोन्ही मंदिरात पार पडले💥 

जिंतूर प्रतिनिधी  / बि.डी. रामपूरकर

 बोरी येथील श्री कलिकुंड पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर व श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात ३१ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान दशलक्षण पर्व उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त रविवार दि.११ रोजी भगवंताची मिरवणूक काढण्यात आली.

दररोज सकाळी अभिषेक, पूजा, आरती सायंकाळी आरती ,प्रवचन व भजनाचे कार्यक्रम दोन्ही मंदिरात पार पडले अनंत चतुर्दशीला अनंतनाथ कथेचे सामूहिक वाचन व पौर्णिमेच्या दिवशी क्षमावलीचा कार्यक्रम घेण्यात आला. एकमेकांना जाणवे प्रदान करून गतवर्षात कळत नकळत झालेल्या चुका व मन दुखावले असेल तर त्याबद्दल एकमेकांची क्षमा मागण्यात आली दशलक्षणपर्व महोत्सवात भक्तामर विधान, चोवीस तीर्थंकर पूजा, श्री शांतिनाथ विधान, बडे बाबा विधान, अनंत चतुर्दशीवृत्त विधान आदि विविध विधान व पूजा संगीतमय वातावरणात घेण्यात आल्या. पूजेला तबल्याची साथ वैभव वायकोस व शाश्वत चवडे यांनी केली.

आज रविवार दि. ११ रोजी सकाळी दशलक्षण पर्वाचा समारोप भगवंताच्या मिरवणुकीने झाला. भगवान महावीर स्वामींची प्रतिमा यावेळी विराजमान करण्यात आली होती . वाजत-गाजत, महावीर स्वामींचे नामस्मरण करीत मिरवणूक परत जैन मंदिरात आल्यानंतर मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर महावीरांच्या भजनाचा कार्यक्रम झाला. मिरवणुकीत विजयकुमार चवडे, दीपक बेंडसुरे, राजू भागवत, मनोज चवडे, नेमीनाथ जैन, विनोद वायकोस, राजेश चवडे, नवल चोभे, गजकुमार पुंड, रामभाऊ गर्भे, वैभव चोभे, वामन बोरचाटे, राजेश ढोकर, रवींद्र चाकोते, कुलभूषण बोरचाटे, अनिल चाकोते, कमलेश जैन, प्रदीप चाकोते यांच्यासह महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या