💥पुर्णेतील महावीर नगरातील अत्यंत गलिच्छ अश्या विहरीत श्रीमुर्ती विसर्जन करण्यास श्री गणेशभक्त नागरिकांचा विरोध...!


 💥नगर परिषद मुख्याधिकारी अजय नरळे यांना दिले निवेदन💥

पूर्णा (दि.०४ सप्टेंबर) :- शहरातील महावीर नगर परिसरातील नरसिंह बावडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विहिरीत श्री गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात गणेशभक्त नागरिकांनी तिव्र विरोध केला असून सदरील विहीरीची अत्यंत गलिच्छ अशी अवस्था झाली असून सदरील विहीरीत या परिसरातील मांस विक्रेते वेस्टेज मांस तसेच कोंबड्यांच्या पंखांसह अन्य घाण तसेच परिसरातील मांसाहारी खानावळ चालक खाणावळीतील मांसाहारी खाद्य तसेच या परिसरातील रुग्नालयांतील मेडीकल मेडीसीन याच विहीरीत टाकत आहेत तसेच शहरातील टाकावू कचरा वर्षभर सातत्याने टाकण्यात येत असल्याने यातील पाणी प्रचंड घाण झाले आहे. 


त्यामुळे या विहिरीत गणेश मूर्ती विसर्जन करण्यात येवू नये असे निवेदन गणेशभक्त नागरिकांनी पुर्णा नगर परिषदेचा मुख्यधिकारी अजय नरळे यांना दिले असून या निवेदनावर घनदाट मामा मित्र मंडळाचे परशुराम उर्फ बाळू जोगदंड,नागेश नागठाणे,चंद्रकांत कदम,प्रा गोविंद कदम,संतोष पटाईत,शिवाजी भालेराव,डॉ.अजय ठाकूर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष गोविंद राज ठाकर,पांडुरंग देवीदासराव कदम शहर उपाध्यक्ष शहर काँग्रेस आय कमिटी पूर्णा. पूर्णा केमिस्ट अँड ड्रगिष्ट असोसिएशन , आडत व्यापारी असोसिएशन पूर्णा,परभणी जिल्हा सराफ व सुवर्णकार असोसिएशन तालुका पूर्णा. आदींसह पूर्णा शहरातील गणेश भक्तांनी दिले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या