💥परभणी शहरासह जिल्ह्यातील कत्तलखाने लंम्पी आजाराच्या पार्श्‍वभूमीवर महिनाभरासाठी बंद करा - भुषण मोरे


💥मोरे यांनी प्रशासनासह परभणी महानगर पालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्याकडे देखील निवेदनाद्वारे मागणी केली आहे💥

परभणी (दि.15 सप्टेंबर) :  परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात लंम्पी आजाराच्या पार्श्‍वभूमीवर शहरासह जिल्ह्यातील कत्तलखाने, कुरेशी (खाटीक) गोवंश मास खानावळी यांना नोटीसा देवून किमान एक महिन्यासाठी हे बंद करण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष भूषण मोरे यांनी प्रशासनासह परभणी महानगर पालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्याकडे देखील निवेदनाद्वारे केली आहे.

           शहर व जिल्ह्यात लंपी आजार सदृश्य आजाराची जनावरे सापडली आहेत. शहराच्या कार्यक्षेत्रात अनेक कुरेशी (खाटीक) कत्तलखाने, खानावळी असून अशा ठिकाणातून जनावरांची कोणतीही तपासणी न होता किंवा ते मांस खाण्यायोग्य असल्याबाबत कोणतेही प्रमाणित दाखले आपल्या कार्यालयाकडून न घेता कत्तलखाने खानावळी विक्री सुरू आहेत. यावर कुठल्याही यंत्रणेचे नियंत्रण नाही त्यामुळे येथील नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. लम्पी या आजाराचा मानवी जीवनावर परिणाम होवू नये यासाठी आपल्याकडे नोंदणी असलेले कत्तलखाने, कुरेशी (खाटीक) गोवंश मास खानावळी यांना नोटीसा देवून किमान एक महिन्यासाठी हे बंद करण्यात यावे, अशी मागणी भुषण मोरे यांनी केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या