💥मराठवाड्यातील बहुजन आंबेडकरी चळवळीतील निष्कलंक निस्वार्थ नेतृत्व काळाच्या पडद्याआड....!

 


💥आनंदराव माधवराव नेरलीकर यांचे हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने दुःखद निधन💥

परभणी/पुर्णा (दि.२४ सप्टेंबर) - रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांचे विश्वासू सहकारी तथा रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय सदस्य व माजी आमदार स्व.माधवराव नेरलीकर साहेब यांचे चिरंजीव आंबेडकरी बहुजन चळवळीतील निष्कलंक निस्वार्थ व्यक्तीमत्व आनंद माधवरावजी नेरलीकर यांचे काल शुक्रवार दि.२३ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री ११-३० वाजेच्या सुमारास हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने दुःखद निधन झाले.

मराठवाड्यातील दलीत बहुजन आंबेडकरी चळवळीतील अत्यंत निष्कलंक निस्वार्थ लढवैये नेतृत्व म्हणून सर्व जाती धर्मियांमध्ये आदराचे स्थान प्राप्त आनंद नेरलीकर साहेब सन्माननीय न्यायाधीश भुषन आनंद नेरलीकर यांचे वडील होते त्यांच्या पश्चात पत्नी रेखाताई आनंद नेरलीकर मुलगा भुषण व मुलगी स्नेहजा असा परिवार आहे.

त्यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते घर बसस्थानक रोड येथून आज शनिवार दि.२४ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ०४-०० वाजता निघणार असून त्यांच्या पार्थिवावर येथील बौध्द स्मशानभुमीत अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत......

त्यांच्या अकाली निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या