💥चिखली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोरील परिसर अंधारात...!


💥रस्त्यावरील हायमास्टसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आतील लाइट देखील बंद नगर परिषदेने लक्ष द्यावे💥 

✍️ मोहन चौकेकर                            

चिखली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोरील हायमास्ट व पुतळ्याचा आतील लाइट बंद आहे. गेल्या आठवडाभरा पासून दोन तिळवेळा हा प्रकार घडला आहे. मागे मी फोन करुन लाऊन घेतले होते आज सुद्धा मी स्वतः Macb घ्या भुसारी साहेबांना फोन लावला असता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जवळील सर्व लाईटची व्यवस्था नगरपरिषदेचकडे असल्याचे सांगितले त्यानुसार मी नगरपरिषदेच्या संबंधित कर्मचारीऱ्याला फोन लावले परंतु त्यांनी फोन उचलले नाही  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वारंवार अंधारात राहतो  हे दिसायला पण चांगले दिसत नाही तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चौक हा कायम चार चाकी व टुव्हिलर गाड्यांच्या वाहतुकीच्या वर्दळीने भरलेला असतो. तसेच पायी जाणाऱ्या नागरिकांची / मानसांची देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौकात कायमच वर्दळ असते तरी नगरपरिषद प्रशासनाने व महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे नाहीतर या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एखादा अपघात देखील होण्याची शक्यता आहे.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या