💥हिंदूगर्वगर्जना शिवसेना संपर्क यात्रे निमित्त पुर्णेत राज्याचे कृषीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद...!


💥मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुत्वाच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी दसरा मेळाव्याला जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहा - मंत्री अब्दुल सत्तार 


परभणी/पुर्णा (दि.२४ सप्टेंबर) - शिवसेनेच्या वतीने राज्यभर हिंदूगर्वगर्जना शिवसेनेची संपर्क यात्रेचे आयोजन करण्यात आले असून आज शनिवार दि.२४ सप्टेंबर २०२२ रोजी या यात्रेनिमित्ताने पूर्णा येथील राजारामबापू सभागृह येथे आयोजित शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यास महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री मा.ना.अब्दुल सत्तार यांनी उपस्थित राहून शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सवांद साधत मार्गदर्शन केले.


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण अंगीकृत करून सर्वाना पुढे घेऊन चाललेले मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांनी जो निर्णय घेतला त्याला राज्यभरात सर्वत्र मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत असून राज्यातील प्रत्येक शहर, जिल्हा आणि तालुक्यातून कष्टकरी, शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांमधून मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांचे प्रचंड संख्येने स्वागत करत समर्थन मिळत असल्याचे याप्रसंगी संबोधित करताना सांगितले. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुत्वाचे विचारांचे सोने लुटण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा जल्लोषात साजरा केला जाणार असून आपण सर्वांनी बहुसंख्येने या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन हि याप्रसंगी केले. 

याप्रसंगी शिवसेना उपनेते विजयजी नाहटा, परभणी शिवसेना संपर्कप्रमुख सुरेशराव जाधव साहेब, सहसंर्कप्रमुख भास्करराव लांगोटे,परभणी शिवसेना जिल्हाप्रमुख माधवराव कदम, व्यंकटराव शिंदे, उपजिल्हाप्रमुख केशवराव कदम एकनाथराव लोखंडे, विधानसभा प्रमुख चंद्रकांत पाटील सुर्यवंशी, तालुकाप्रमुख प्रकाशराव कऱ्हाळे, शहर प्रमुख विशाल किरडे, तसेच  शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या