💥स्वदेशी न्यूज पोर्टलचा सहावा वर्धापन दिन उत्साहात साजरा.....!


💥विविध क्षेत्रातील मान्यवरांचा स्वदेशी पुरस्कार देऊन सन्मान💥


जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

                मागील सहा वर्षापासून परभणी जिल्ह्यासह राज्यभरात, डिजिटल युगात तत्परतेने बातम्या पोहोचवून, वाचकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण करणाऱ्या स्वदेशी न्यूज पोर्टलचा 6 वा वर्धापन दिन सोहळा,  रविवार 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी 06 वाजता जिंतूर शहरातील माजी सैनिक मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.



यावेळी शिक्षण, प्रशासन, पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांना  स्वदेशी न्यूज पोर्टलच्या वतीने स्वदेशी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

यामध्ये पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार, ज्येष्ठ पत्रकार राजेभाऊ नगरकर, ज्येष्ठ पत्रकार एम. ए. माजिद, आदर्श शिक्षक महंमद एकबाल शेख इस्माईल, केंद्रीय प्राथमिक शाळा इटोली घ्या वतीने येथील शिक्षक,मेनकुदळे सर, नेट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी रेहान खान अब्दुल रउफ खान पठाण,जेईई परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी पारस विजय टाक यांचा स्वदेशी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मा. आ. विजय भांबळे यांनी डिजिटल मीडिया बद्दल माहिती सांगितली. व मधुनच कोपरखळी ही घेतली.आजचे युग जलदगतीचे असल्याने स्वदेशी न्यूज पोर्टल च्या माध्यमातून जलद बातम्या पाहवयास मिळतात असे मा.आ. विजय भांबळे यांनी सांगितले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजय भांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती मनोज थिटे, माजी समाज कल्याण सभापती रामराव उबाळे, जिल्हा परिषद सदस्य गणेशराव इलग, आम आदमी पार्टीचे अँड. सुनील बुधवंत,माजी नगरसेवक बंटी निकाळजे यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाला जिंतूर तालुक्यातील सर्व पत्रकार, डॉक्टर, शिक्षक, विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार प्रदीप कोकडवार यांनी केले.तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पत्रकार रत्नदीप शेजावळे यांनी केले. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर उपस्थित नागरिकांसाठी आयोजकांच्या वतीने स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वदेशी न्युज पोर्टलचे, मुख्य संपादक अजमत पठाण, कार्यकारी संपादक भागवत चव्हाण, संदीप माहूरकर, जिंतूर ई.मी.कार्याध्यक्ष बाळासाहेब रामपूरकर, महेश देशमुख, खयूम भाई, रहीम भाई, माबुद खान,फेरोजभाई, दिलीप माघाडे, मनोज टाक, सचिन रायपत्रीवार, हनीफ भाई, रामप्रसाद दराडे आदींनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या