💥पुर्णा तालुक्यातील वजुर विज पडल्यामुळे शेतकऱ्याच्या दोन बैलांचा मृत्यू....!


💥प्रशासनाने तात्काळ पंचणामा करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे💥


पुर्णा (दि.०९ सप्टेंबर) - तालुक्यातील वजुर येथे आज शुक्रवार दि.०९ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ०१-४५ ते ०२-०० वाजेच्या सुमारास विज पडल्यामूळे शेतकरी नारायन सोनबा जोरवर यांच्या शेतातील एक बैल तात्काळ मरण पावला तर दुसरा जख्मी बैलाचा देखील अवघ्या काही वेळे नंतर मृत्यू झाल्यामुळे ऐन कामाचे दिवस असताना त्या शेतकऱ्याचे जवळपास १ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. 

संबंधित शेतकरी नारायन जोरवर यांच्या मयत बैलांचा प्रशासनाने तात्काळ पंचणामा करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.....  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या