💥बोरी मंडळात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी तहसीलदाराला दिले निवेदन....!


💥बोरी मंडळाच्या पीक परिस्थितीचा विचार करून दुष्काळी परिस्थितीत समाविष्ट करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

 जिंतूर तालुक्यातील बोरी मंडळातील शेतकरी यांच्यामार्फत  जिंतूरच्या तहसीलदारांना दिनांक 16 सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जुलै महिन्यात सतत पडलेल्या पावसामुळे व कालच्या 10 ऑगस्ट पासून ५ सप्टेंबर पर्यंत न पडलेल्या पावसामुळे 25 ते 30 दिवस न पडलेल्या पावसाच्या खंडामुळे सर्व कापूस सोयाबीन मूग दूर पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे काही भागात सोयाबीन वाळवून नामनिर्देश आली आहे परिस्थिती झालेली काही भागात सोयाबीन हिरवे असून सुद्धा शेंगा भरण्याचा परिस्थितीत नाहीत बोरी मंडळाच्या पीक परिस्थितीचा विचार करून दुष्काळी परिस्थितीत समाविष्ट करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन जिंतूर तहसीलदार सखाराम मांडवगडे यांना देण्यात आले आहे या निवेदनावर पंडितराव घोलप अनंतराव श्रीरंगराव चौधरी अमृतराव चौधरी मुंजाभाऊ पांडे दिनकर चौधरी गुलाब सुधाकर चौधरी तुकाराम गोरे राजेभाऊ  खापरे आदींची स्वाक्षऱ्या आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या