💥पुर्णेतील बुद्ध विहारात मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण....!


💥पूर्णा तहसीलचे नायब तहसीलदार नितेशकुमार बोलेलु यांच्या हस्ते राष्ट्र ध्वजाचे करण्यात आले ध्वजारोहण💥

पूर्णा (दि.17 सप्टेंबर) - येथील बुद्ध विहारात आज शनिवार दि.17 सप्टेंबर रोजी भदंत उपाली थेरो ग्रंथालय येथे मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो भदंत पयावंश यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पूर्णा तहसीलचे नायब तहसीलदार नितेशकुमार बोलेलु यांच्या हस्ते राष्ट्र ध्वजाचे ध्वजारोहण सकाळी ०८-०० वाजता करण्यात आले.


यावेळी नगरसेवक एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड आनंद नेरलीकर शामराव जोगदंड दिलीप गायकवाड टी झेड कांबळे अमृत मोरे पी.जी. रणवीर बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे विजय बगाटे आदीसह महिला मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त उपस्थित त्यांना अल्पोपहार व मिठाईचे वाटप विहार समितीच्या वतीने व शामराव जोगदंड यांच्या वतीने करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या