💥पुर्णा तालुक्यातील फुकटगाव जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अबनराव पारवेंना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार....!💥गौर गावातील छत्रपती शंभुराजे गणेश मंडळाच्या वतीने अबनराव पारवे सरांचा करण्यात आला सत्कार💥

पुर्णा (दि.०७ सप्टेंबर) - पुर्णा तालुक्यातील फुकटगाव जिल्हा परिषदेतील कर्तृत्ववान शिक्षक अबनराव पारवे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा त्यांच्या मुळ गावी गौर येथे काल मंगळवार दि.०६ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळच्या सुमारास येथील  छत्रपती शंभुराजे गणेश मंडळाच्या वतीने असंख्य गावकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य सत्कार करण्यात आला.


आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त अबनराव पारवे सर तालुक्यातील फुकटगाव येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असून त्यांनी आपल्या कर्तृत्वाने शाळेतील विद्यार्थांचीच नव्हे तर संपूर्ण गावकऱ्या मन जिंकली असून त्यांनी फुकटगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील केलेल्या सुधारणेमुळे संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांच्या जन्मगाव असलेल्या गौर गावाची देखील मान उंचावल्यामुळे व त्यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचा छत्रपती शंभुराजे गणेश मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला...

**********************************************

💥गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केला अबनराव पारवे सर यांचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या