💥पुर्णा नगर परिषद प्रशासनाने लम्पी महामारीच्या पार्श्वभूमीवर मोकाट गुरांचा तात्काळ बंदोबस्त करावा....!


💥प्रशासनाने मोकाट जनावरांचे लसीकरण करून सदरील मोकाट जनावर जप्त करीत त्यांची हर्रासी करावी अशी मागणी होत आहे💥

पुर्णा (दि.२१ सप्टेंबर) - राज्यासह परभणी जिल्ह्यात देखील जनावरांमध्ये लम्पी महामारीचा प्रादुर्भाव हळुवारपणे पाय पसरत असून या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोखण्यासाठी राज्य शासनासह स्थानिक प्रशासन देखील युध्द पातळीवर लसीकरण मोहीम राबवत आहे सदरील लसीकरणाची मोहीम शहरी भागासह ग्रामीण भागात देखील राबवली जात असतांना मात्र या लसीकरण मोहीमेतून शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मोकाट फिरणारी जनावर ज्यात गाय वळू तसेच डुक्कर व अन्य जनावर सुटत असल्यामुळे ही मोकाट जनावर शहरासह ग्रामीण भागातील शेतशिवारांमध्ये सर्वत्र मुक्त संचार करीत असल्यामुळे या जनावरांपासून अन्य जनावरांसह मनुष्याला देखील या लम्पी आजारापासून धोका होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे पुर्णा नगर परिषद प्रशासनासह तालुका प्रशासनाने देखील तात्काळ दखल घेऊन संबंधित जनावरांचा बंदोबस्त करावा नसता या मोकाट जनावरांचे लसीकरण करून सदरील मोकाट जनावर जप्त करीत त्यांची हर्रासी करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी बांधवांतून होतांना दिसत आहे....

💥लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर जनावरांची होणारी कत्तल तसेच मांस विक्री तात्काळ थांबवावी :-

राज्यासह संपूर्ण परभणी जिल्ह्यात देखील जनावरांमध्ये लम्पी आजार हळुवारपणे पाय पसरत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने जनावरांच्या खरेदी विक्रीसह जनावरांच्या बाजारावर देखील बंदी घातली असून प्रशासनाने आता या लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर सन्माननीय जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी जिल्ह्यातील तालुका प्रशासनांना जनावरांच्या होणाऱ्या कत्तलीसह मांस विक्रीवर देखील बंदी घालण्याचे आदेश जारी करावेत कारण जिल्ह्यातील मांस विक्रेते चोरी छुपे सर्रास अश्या आजारी जनावरांच्या कत्तली करून त्या मांसाची विक्री करीत असल्यामुळे या बिमार जनावरांचे मास खाण्यामुळे मनुष्याच्या आरोग्यावर देखील याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या