💥राष्ट्रीय सेवा योजना संस्कारक्षम संस्कृतीचे ज्ञानपीठ - प्रा.डॉ.बापूराव आंधळे


💥विद्यार्थीनींनी रासेयोत सहभागी होत राष्ट्रनिर्माण कामी योगदान देत विविध सन्मानाचे मानकरी व्हावे असे ही ते म्हणाले💥

              राष्ट्रीय सेवा योजना हे संस्कारक्षम संस्कृतीचे ज्ञानपीठ असून माणसाला सर्वांगीण उन्नती करण्यासाठीची सुवर्णसंधी होय.लोकजीवनात सेवा सर्मपणाच्या निमित्तानं धडे देणारी खरी पाठशाला आहे.विद्यार्थीनींनी रासेयोत सहभागी होत राष्ट्रनिर्माण कामी योगदान देत विविध सन्मानाचे मानकरी व्हावे असा आशावाद प्रा.डॉ.बापूराव आंधळे यांनी व्यक्त केला.


      कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी येथे  राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त आयोजित श्रमदान व उदबोधन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून प्रा डॉ बापूराव आंधळे बोलत होते. मान्यवरांचे हस्ते म. गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  प्रा.डॉ.गणेश जाधव तर व्यासपीठावर रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.अरुण पडघन उपस्थित होते.कु.गीता कत्ते,कु.आरती बोधले या रासेयो विद्यार्थीनींच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.अरुण पडघन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून रासेयोची ध्येय उद्दीष्टे स्पष्ट करीत पाहुण्यांचा परिचय करून दिला.

        प्रसंगी  श्रमदानातून परीसर स्वच्छतेसाठी प्रा.डॉ.बापूराव आंधळे,प्रदिपराव गाडेकर, प्रा.डॉ.गणेश जाधव,प्रा.परमेश्वर यादव, भीमराव डहाळे, ज्ञानेश्वर रेंगे माऊली,प्रा.अरुण पडघन,कु.गीता कत्ते,कु.आरती बोधले, खुशी शेख, प्रीती राऊत, निकिता येलपुलकर, हर्षदा कांकरिया, हेमा गवळे, मोनिका डुकरे, प्रेरणा येडे, ऐश्वर्या कराळे,शिवानी गाडेकर, कुमारी दुधाटे, आरती तेवर, शांभवी महाजन, गीता पारवे आदींनी हाती झाडू घेत महाविद्यालयाच्या संपूर्ण परिसराची स्वच्छता केली. 

       स्वच्छता ही सेवा आहे.सेवेत ईश्वर आहे.आपण प्रत्येकाने म.गांधीजींनी सांगितलेल्या सत्य, अहिंसा,प्रेमाच्या मार्गाने वाटचाल करीत व्यक्ती हितासह  स्वच्छ, सुंदर,निरोगी,नीतीवान समाज निर्माणात योगदान द्यावे,असे आवाहन अध्यक्षीय समारोपात प्रा.डॉ.गणेश जाधव यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या कराळे हिने केले तर आभार गीता पारवे हिने व्यक्त केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या