💥पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील हटकर गल्लीत अखेर खा.संजय जाधव यांच्या सहकार्याने मिळाला डिपी....!


💥ऐन श्री.गणेश व गौरी महोत्सव सनात आंधाराचे विघ्न टळले💥

पुर्णा (दि.०६ सप्टेंबर) - तालुक्यातील ताडकळस येथील हटकर गल्ली येथे गेल्या दोन वर्षांपासून सततच डिपी जळुन नादुरुस्त होत असल्याने येथे राहणाऱ्या ग्रामस्थांना दोन वर्षांपासून विविध सण उत्सव अंधारातच साजरे करावे लागत असुन गेल्या १५ दिवसांपासून डिप्पी नादुरुस्त असल्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते. अखेर खा. संजय जाधव यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क करून रविवारी रात्री उशिरा डिप्पी सुरू झाल्याने ऐन गणेश व गौरी उत्सवातील आंधाराचे विघ्न नष्ट झाले. 

ताडकळस येथील हटकर गल्ली येथील डिपीवरील मोठ्या प्रमाणात गावांतील घरगुती विद्युत पुरवठा होत असतो. येथील डिपी दर महिन्याला जळुन नादुरुस्त होत असल्याने येथे राहणाऱ्या ग्रामस्थांना अंधार सोबत विविध अडचणींना गेल्या दोन वर्षांपासून तोंड द्यावे लागत आहे.या परिसरातील ग्रामस्थांना दिपावली,पंचमी,पोळा, गणेशोत्सव, नवरात्र अशा सणाच्या दिवसात देखील गेल्या दोन वर्षांपासून विद्युत पुरवठा खंडित राहत असल्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण होत आहे. 

या गंभीर बाबीकडे गावातील लोकप्रतिनिधी व विद्युत मंडळाच्या वरिष्ठांनी याची दखल घेऊन या परिसरात स्वतंत्र दुसरा डिपी उपलब्ध करून सुरळीत विज पुरवठा सुरू करावा अशी मागणी ताडकळस येथील हटकर गल्लीतील ग्रामस्थांतुन करण्यात आली आहे. गत १५ दिवसांपासून येथील डिप्पी नादुरुस्त असल्याने अंधार झाला होता. सध्या श्री गणेश उत्सवाची धामधूम असुन गौरीचे आगमन देखील झाले आहे. ऐन सणाच्या दिवसातच विद्युत पुरवठा बंद असल्याने या परिसरातील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. या प्रकरणी ताडकळस येथील शिवसेना शहरप्रमुख दिलीपराव आंबोरे पाटील, उप शहरप्रमुख अनिल नरवटे, दलित आघाडीचे तालुका संघटक सुरेश मगरे यांनी खा. संजय जाधव यांची भेट घेऊन हा प्रकार सांगितला . लगेच महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्यांशी खा. जाधव यांनी संपर्क करून सध्या गणेश उत्सवासह गौरी आगमन असल्याने ताडकळस येथील हटकर गल्लीतील डिप्पी तात्काळ देण्याची शिफारस केली असता रविवार ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता डिप्पी मिळाल्याने  रात्री ११ वाजता पंधरा दिवसापासून आंधाराचे विघ्न टळले. हा डिप्पी मिळाल्याने हटकर गल्लीतील ग्रामस्थांतुन खा. संजय जाधव यांचे या गल्लीतील नागरीक आभार असुन सर्व नागरीकात आंनद व्यक्त होत आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या