💥सेलू येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा तीव्र निषेध करत मजलिस-ए-इन्सानियत मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन....!


💥महाराष्ट्र शासनाने सदर प्रकरणी जलदगती न्यायालय स्थापन करून गुन्हेगारांना कठोर शासन करावे अशी मागणी💥

सेलू शहरातील अल्पवयीन शाळकरी मुलीचे अपहरण करून बलातकार केल्याची निंदणीय घटना घडली आहे. या घटनेतील गुन्हेगारांना सेलु पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवुन अटक केली आहे. सदरील प्रकरणी अधिक तपास चालू आहे.


सदर घटनेमुळे नागरिकामध्ये तिव्र संतापाची भावना आहे. गुजरात राज्यातील भाजप सरकारने बलात्काराच्या आरोप सिध्द झालेल्या व शिक्षा झालेल्या गुन्हेगारांना शिक्षेत माफी देवुन सुटका केल्यामुळे बलात्कारी गुन्हेगारांना न्याय व्यवस्थेची भीती राहीली नाही यामुळे महीलावरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. तसेच निर्भया कायद्यातील निधी आणि तरतुदी याचा फडणवीस सरकारच्या काळात फारसा वापरच केला नाही. यामुळे महीला अत्याचारास प्रतिबंध करण्यास भाजप सरकारच्या राजकिय इच्छाशक्तीचाच अभाव आहे. वरील घटणेने मुली व महीला यांच्या सुरक्षीततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी पुढील मागण्या करीत आहोत.

महाराष्ट्र शासनाने सदर प्रकरणी जलदगती न्यायालय स्थापन करून गुन्हेगारांना कठोर शासन करावे आणि निर्भया कायद्याच्या तरतुदी अमलात आणाव्यात या अन्य मागण्यासाठी निवेदन करण्यात आल्या आहेत.

या निवेदनावर संस्थापक अध्यक्ष नितीन सावंत, जिल्हा कार्याध्यक्ष शेख अझहर, जिल्हा उपाध्यक्ष काशीफ रजा अंसारी, रामप्रसाद अंभूरे, जिल्हा प्रवक्ता वैभव शेटे, शेख मुसेफ, श्रीराम पांढरकर, ईश्वर गिरी आदींच्या सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या