💥जिंतूर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी केला आम आदमी पार्टीत जाहीर प्रवेश....!


💥याच कार्यक्रमात सुधीर राठोड यांनी अ‍ॅड.मोहसिन पठाण यांच्या हस्ते आम आदमी पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

आज दिनांक 25/09/2022 रोजी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील आम आदमी पार्टी युवा आघाडी च्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. युवक तालुका उपाध्यक्ष अजय मस्के पाटील, युवक तालुका सचिव कृष्णा घुगे व युवक तालुका सह-सचिव दत्तराव लोखंडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याच कार्यक्रमात सुधीर राठोड यांनी अ‍ॅड.मोहसिन पठाण यांच्या हस्ते आम आदमी पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी  आम आदमी पार्टी परभणीचे युवक जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुनिल शिवाजीराव बुधवंत, जिंतूर तालुकाध्यक्ष श्री. अ‍ॅड. मोहसिन महेफुज पठाण व जिंतूर युवक तालुकाध्यक्ष श्री. आदित्य पांचाळ व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या