💥पुर्णा तालुक्यात ओल्या दुष्काळानंतर कोरड्या दुष्काळाचे सावट.....!


💥निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल💥

पूर्णा (दि.०२ सप्टेंबर) - तालुक्यात मागील पंचवीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील सोयाबीन कापूस तूर ही पिके अक्षरशा वाळण्याच्या मार्गावर आहेत.


पावसाच्या प्रदिर्घ विश्रांती घेतल्याने सध्या फुलातआणि काही ठिकाणी शेंगा भरण्याच्या अवस्थेत असलेले सोयाबीन हे पिक कडक ऊनाने करपुन जात आहे, निसर्गाच्या या  लहरि पनाचा फटका शेतक-यांना नेहमि बसत आलेला आहे कधी गारपीट तर कधी अतिवृष्टी मुळे  शेतकऱ्यासमोरील नेहमीच संकटे उभी टाकली आहेत,याहि वर्षी हे संकट  कायम दिसून येत असून  मागील महिण्यात पावसाने कहरच केला त्यामुळे  पावसाने पिकाची वाढ खुंटली कसंबस सोयाबिन,  शेंगा भरण्याच्या, अवस्थेत आसताना, ऐनवेळी पावसाने प्र दीर्घ विश्रांती घेतल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे, सोयाबीन करपुन जातं आहेत, परिणामी यंदा मोठ्या प्रमाणात सोयाबीनच्या उत्तरामध्ये मोठी घट होणार आहे.. 


तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तहसीलदार पूर्णा व तसेच तालुका कृषी अधिकारी पूर्णा यांना  दुष्काळ जाहीर करण्याबाबत निवेदन देण्यात आले यावेळी प्रहार उपजिल्हा प्रमुख नरेश जोगदंड, प्रहार तालुका प्रमुख  शिवहार सोनटक्के,  श्रीहरी इंगोले मंचक कुऱ्हे, गंगाधर इंगोले, रमेश जाधव, विठ्ठल बुचाले, राम सुके आदींची उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या