💥परभणी जिल्ह्याचे शिवसेना खा.संजय जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हजारो धनगर समाज बांधव करणार शिवसेनेत प्रवेश..!


 💥शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या धनगर समाज बांधवांचे पुर्णा तालुका युवा सेना तालुका प्रमुख आप्पा बनसोडेंनी केले सहर्ष स्वागत💥

परभणी (दि.२५ सप्टेंबर) - परभणी लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उद्या सोमवार दि.२६ सप्टेंबर रोजी घटस्थापनेच्या मुहूर्तावर दुपारी १२-०० वाजेच्या सुमारास हजारो धनगर समाज बांधव शिवसेनेत प्रवेश करणार असून हा शिवसेना प्रवेश सोहळा खासदार जाधव यांच्या कार्यालयात पार पडणार आहे.

जिल्ह्यातीला धनगर समाज बांधवांनी घेतलेल्या शिवसेना प्रवेशाच्या निर्णयाचे पुर्णा तालुका युवा सेना तालुका प्रमुख आप्पा बनसोडे यांनी त्यांचे शिवसेना/युवा सेना परिवाराकडून सहर्ष स्वागत केले असून त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या