💥रुग्णहक्क समितीच्या रक्तदान शिबिरास गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.....!


💥सदरील शिबिर मिर्झापूरचे सर्कल अध्यक्ष सर्जेराव पालवे यांच्या अध्यक्षतेखाली ठेवण्यात आले💥

जिंतूर प्रतिनिधी  / बि.डी. रामपूरकर

रुग्न हक्क संरक्षण समिती परभणी जिल्हा च्या वतीने झरी येथील मिर्झापूर गावात गणपती बाप्पाच्या  विसर्जना निमित्त भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले हे शिबिर मिर्झापूरचे सर्कल अध्यक्ष सर्जेराव पालवे यांच्या अध्यक्षतेखाली ठेवण्यात आले.

यावेळी परभणी जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर जिल्हा उपाध्यक्ष रमेश घनसावंत महिला जिल्हा कार्याध्यक्ष सुरेखा खिल्लारे महिमा खिल्लारे रुग्णसेवक रवी साबळे, परभणी जिल्हा संपर्कप्रमुख शेख रहीम जिंतूर तालुका अध्यक्ष सय्यद फेरोज संघटक राजेंद्र घनसावंत स्वराज इंडिया चे जिल्हाध्यक्ष गोविंद गिरी आश्रुबा शिरसाट महिमा खिल्लारे बी एस पी चे विधानसभा अध्यक्ष सर्जेराव पालवे गावातील सरपंच उपसरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या उपस्थितीत 34 रक्तदात्यांनी रक्तदान केले रुग्णाक्का संरक्षण समितीच्या वतीने रक्तदान करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुग्णहक्क संरक्षण समितीचे सर्कल अध्यक्ष अध्यक्ष सर्जेराव पालवे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या