💥हिंगोली जिल्ह्यातील पानकनेरगावात मोटार बाईकवर गौराईचे आगमन......!


💥महालक्ष्मीने घेतले लोकांचे लक्ष वेधून : महालक्ष्मी बघण्यासाठी लोक उत्साहित💥


✍🏻हिंगोली : शिवशंकर निरगुडे 

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील पानकनेरगांवात घरोघरी महालक्ष्मीचे आगमन झाले त्यामुळे गावात सर्वत्र उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले त्यातच मिराताई संतोष क्षिरसागर यांच्या घरी गौराईचे बूलेटवर आगमन झाले सदरील क्षिरसागर यांच्या घरी वेगळ्या पद्धतीने आगमन झाल्याने गावातील लहानथोरग्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 


महाराष्ट्रात गौरी-गणपती हा उत्सव अगदी उत्साहात साजरा होतो. या उत्सवाची लगबग श्रावण महिन्यापासूनच सुरू होते. गणपतीच्या आगमनानंतर तिसऱ्या दिवशी गौरी येतात. महाराष्ट्रात गौरी पूजनाची प्रथा पारंपारिक पद्धतीने चालत आलेली आहे संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणणा-या या गौरीच्या आगमनाची उत्सुकता लहानथोर सर्वांनाच असते. गणपतीच्या आगमनासोबतच लगबग सुरू होते ती गौरीच्या स्वागताची विविध रंगांतल्या, आकारातल्या  इलेक्ट्रिकच्या या माळा गौरीच्या सजावटीच्या रात्रीच्या काळोखात अधिकच उठून दिसतात. आपल्या घरात आलेल्या गौरीचा अनेक प्रकारे थाट आणि साज-सजावट केली जाते. माहेरवाशीणीचा हा थाट करण्यासाठी घरातील महिलांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असते असे म्हणत गणपतीच्या आईचे म्हणजेच गौरींचे माहेरवाशिणीसारखे स्वागत केले जाते. त्यांना नवीन वस्त्र, दागदागिने घालून सजविण्यात येते. माहेरवाशिणी आहेत असे मानून त्यांचे अत्यंत आपुलकीने स्वागत केले जाते. गौरी म्हणजे संपत्तीची देवता लक्ष्मीचे प्रतीक आहेत असे मानत ग्रामीण भागात स्वागत केले जाते.

महालक्ष्मी निमित्ताने कुटुंबातील सगळे जण एकत्र येतात. त्यावेळी आपल्या घरी माहेरवाशीण म्हणून तीन  दिवस राहणाऱ्या या गौरींसाठी छानशी सजावटही केली जाते. यामध्ये फुलांनी, घरातील स्त्रियांनी केलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंनी किंवा बाजारात तयार मिळणारे सजावटीचे सामान वापरुन सजावट केली जाते.गौरीच्या मुखवट्यांमध्येही शाडूच्या पितळ्याच्या, कापडाच्या, फायबरच्या असे बरेच प्रकार पाहायला मिळतात. काहींकडे केवळ मुखवट्यांची पूजा होते तर काहींकडे पूर्ण उभ्या गौरी असतात.

गौराईला मंगळसूत्र, नेकलेस, मोहनमाळ, नथ, झुबे, बिंदी, कंबरपट्टा, बाजूबंद अशा दागिन्यांचा साज असतो... गौराईला काठापदराची किंवा जरीची साडी नेसवली जाते... फुलांच्या माळा, मखरे रांगोळ्या  यांचा वापर करून गौराईला घरामध्ये  छान सजावट केली जाते

गौरी आगमनासाठी महिला तळीवर गौरींचे पाठ पूजन करून घरात स्थापना करतात. गौरीला सजवण्यासाठी पारंपरिक मातीचे मुखवटे, हात, गौंरीची मांडणी यांचा वापर करण्यात येतो. तिचं  पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं जातं. घरातील सर्व महिला एकत्र येत गौरीला छान सजवतात. नऊवारी साड़ी, शाल व दागिने गौरीला परिधान करून  तिला छान असं सजवण्यात येतं हा सण तीन दिवस असतो व तो घरोघर साजरा केला जातो. पहिल्या दिवशी आगमन, दुस-या दिवशी गौरी भोजन व तिसर्‍या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल अष्टमीला या गौरीचे  विसर्जन करण्यात येते. तीन दिवस अगदी आनंदाचे, उत्सवाचे वातावरण असते.

प्रतिक्रिया - मिराताई संतोषराव क्षिरसागर :-

महालक्ष्मीचे आगमन हा महिलांचा आवडता सोहळा असतो. घराची स्वच्छता करण्यापासून ते त्यांच्यासाठी वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांची मेजवानी आणि रेखीव, कलाकुसरीच्या दागिन्यांची भेट देऊन महिला महालक्ष्मींचे स्वागत  केल्या जाते शेवटच्या क्षणापर्यंत महिलांचे सजावटीचे काम सुरू असते.रात्र जागून जय्यत तयारी करण्यात येते यंदाही घराघरांत महालक्ष्मींच्या स्वागतासाठी नावीन्यपूर्ण साहित्याची सजावट करण्यात आली आहे.

महालक्ष्मी हा सर्वांत महत्त्वाचा आणि मोठा सण म्हणजे ज्येष्ठागौरींचे आगमन. या सणाच्या तयारीसाठी होणाऱ्या धावपळीत आणि दगदगीतसुद्धा स्त्रियांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद व समाधान असते.त्याचेच औचित्य साधून आज आमच्या घरी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही थाटामाटात महालक्ष्मीचे आगमन झाले परंतु यावर्षी वेगळ्या पद्धतीने महालक्ष्मीचे मोटार बाईकवर आगमन झाले त्यामुळे गौरी आली सोन्याच्या पावली.....गौरी आली चांदीच्या पावली.....गौरी आली गाई वासराच्या पावली.....गौरी आली, पुत्र-पोत्रांच्या पावली हा आनंद आमच्या घरात दिसतोय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या