💥परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील कोक शिवारात अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी केला बलात्कार....!


💥सेलू पोलिस स्थानकात अज्ञात नराधमां विरोधात गुन्हा दाखल💥

परभणी (दि.०६ सप्टेंबर) - परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील कौसडी फाटा परिसरातून दोन अज्ञात नराधमांनी एका अल्पवयीन दहा वर्षीय मुलीला मोटारसायकल वर उचलून नेऊन कोक शिवारात बलात्कार केल्याची मानुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

जिल्ह्यातील सेलू पोलीस स्थानकात त्या पिडीत अल्पवयीन मुलीच्या आईने काल सोमवार दि.०५ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी एक तक्रार दाखल केली त्याद्वारे आपली दहा वर्षीय दहा महिन्याची मुलगी व बहिणीचा मुलगा या दोघांना अज्ञात व्यक्तींनी मोटरसायकलवर पळून नेले; जिंतूर तालुक्यातील कौसडी फाट्यावर मुलास मारहाण करून ढकलून दिले तर आपल्या अल्पवयीन मुलीवर कोक शिवारात त्या दोंघा अज्ञात व्यक्तींनी बलात्कार केला असे नमूद केले .

 दरम्यान सेलू पोलिसांनी मंगळवारी पहाटे या घटनेबद्दल गुन्हा दाखल केला आहे अतिरिक्त पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच  पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक हे घटनास्थळी रवाना झाले आहेत. सेलू पोलिसांनी या प्रकरणात जलद गतीने तपास सुरू केला आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास भाग्यश्री पुरी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या