💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या मागणीला यश : खाजगी रेशन कार्ड ऑनलाइन करणाऱ्या ऑपरेटरचे काम यापुढे बंद....!


💥दिव्यांगाना पिवळे रेशन कार्ड तात्काळ उपलब्ध करुन देण्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे आदेश💥

परभणी (दि.०१ सप्टेंबर)  - जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालया अंतर्गत येणाऱ्या रेशन कार्ड ऑनलाइन करण्यासाठी खाजगी डाटा एंट्री ऑपरेटर चा वापर केला जात आहे. मागील तीन वर्षापासून रेशन कार्ड ऑनलाईन करण्यासाठी शासकीय यंत्रणेने स्वतःचा माणूस डाटा एंट्री ऑपरेटर नेमलेला नसल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे त्याचाच फटका गोर गरीब रेशन कार्ड धारकाला व अंतोदय योजनेतील पिवळे रेशन कार्ड ची प्रतीक्षा करणाऱ्या दिव्यांग बांधवांना बसत असून योग्य वेळी रेशन कार्ड मिळत नाही तसेच जिल्ह्यातील जवळपास सर्वच तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या आशीर्वादाने काही खाजगी डाटा इंट्री यांची नियमबाह्य पद्धतीने नियुक्ती करून त्यांना रेशन कार्ड ऑनलाईन कार्यासाठी वापरण्यात येणारे गुप्त शासकीय युजर नेम आणी पासवर्ड नियमबाह्य पद्धतीने दिला जातो. या खाजगी डाटा इंट्री ऑपरेटर कडून रेशन कार्ड धारकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट केली जात आहे. जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातील खाजगी डाटा इंट्री ऑपरेटर नियुक्ती प्रकरणाची चौकशी करुन कार्यवाही करा व सर्व तहसील कार्यालयात शासकीय यंत्रणांचा डाटा इंट्री ऑपरेटर नियुक्त करावा तसेच दिव्यांगांना  अंत्योदय योजनेतील पिवळे रेशन कार्ड तात्काळ उपलब्ध करून दिले द्यावे व या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्षाच्या शिष्ट मंडळा सह जिल्हाधिकारी मॅडम यांना दिले होते तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मंजुषा मुथा मॅडम यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर तक्रार दिली होती.

या तक्रारीची तात्काळ दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकारी मॅडम यांनी दि.२९ ऑगस्ट २०२२ रोजी एक पत्रक काढून जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना आदेशित केले आहे की प्रहार जनशक्ती पक्षाने दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण तात्काळ चौकशी करून जिथे खाजगी डाटा एंट्री ऑपरेटर रेशन कार्ड ऑनलाइन करतात त्यांना तात्काळ इथून काढून टाकावे व प्रत्येक दिव्यांगांना पिवळे रेशन कार्ड तात्काळ उपलब्ध करून द्यावे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थापना विभागाला तहसील कार्यालयातील रेशन कार्ड ऑनलाईन करण्यासाठी नवीन डाटा इंट्री ऑपरेटर नियुक्त करण्याबाबत कार्यवाही करणे बाबत सूचना देखील दिलेल्या आहेत.

या बाबत प्रहार जनशक्ती पक्षाने दिलेल्या निवेदनाची तात्काळ दखल जिल्हा पुरवठा विभागाने घेतली असून यावर कारवाईला सुरुवात केली आहे यामुळे जिल्ह्यातील सर्व गोरगरीब रेशनकार्डधारकांना व दिव्यांग बांधवांना न्याय मिळणार आहे जिल्हा अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनावर निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हाप्रमुख गजानन चोपडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख माधवीताई घोडके, तालुकाप्रमुख ज्ञानोबा काळे, शहर प्रमुख धर्मेंद्र तूपसमुद्रे, सर्कल प्रमुख श्याम भोंग, शहर चिटणीस वैभव संघई, शेख युनूस, शेख बशीर, सचिन शेरे, शाखाप्रमुख विष्णू गोल्डे, अनिल पाटोळे आदींच्या स्वाक्षऱ्या होत्या......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या