💥पुर्णा शहरातील रेल्वे पुलाखालील भुयारी मार्गाची परिस्थिती पुन्हा एकदा जैसे थेच....!


💥या भुयारी मार्गाच्या गंभीर प्रश्नावर कुंभकर्णी झोपेतील प्रशासन केव्हा कायमस्वरूपी तोडगा काढणार ?💥

पुर्णा (दि.१२ सप्टेंबर) - शहरा बाहेरील रेल्वे पुलाखालील पावसामुळे साचणारे पाणी या रस्त्याने प्रवास करणाऱ्यांसाठी अक्षरशः डोकेदुखी ठरत आहे या रेल्वे भुयारी मार्गातील या धोकादायक परिस्थिती संदर्भात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी रेल्वे प्रशासनासह नगर परिषद प्रशासनाला देखील निवेदने देण्यात आली परंतु रेल्वे प्रशासनासह नगर परिषद प्रशासनातील निद्रीस्त अधिकाऱ्यांनी याकडे सपशेल दुर्लक्ष करीत सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनाला केराची टोपली दाखवली त्यामुळे या भुयारी मार्गाचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाल्याचे दिसत आहे.


या भुयारी मार्गा संदर्भात प्रशासनाला जागृत करण्यासाठी अनेक पत्रकारांनी बातम्याही लावल्या परंतु संबंधित रेल्वे प्रशासनासह नगर परिषद प्रशासनाने देखील जनाची नाही मनाची तरी लाज बाळगून या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन यावर कायमस्वरूपी तोडगा काढायला हवा होता परंतु नगर परिषद प्रशासनासह रेल्वे प्रशासनाने देखील वेळकाढू धोरणाचा अवलंब करीत या भुयारी मार्गाच्या दुरूस्तीला प्राथमिकता दिली नसल्यामुळे असे निदर्शनास येते की या मार्गावर एखादी मोठी दुर्घटना झाल्या शिवाय संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना जाग येणार नाही. मागील जुन महिन्यात नगर परिषद प्रशासनाने भुयारी मार्गाच्या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा न काढता थातुरमातुर पाणी काढुन रस्ता मोकळा केला होता परंतु पुन्हा पाऊस,पुन्हा साचलेले पाणी आणि पुन्हा एकदा याचं रस्त्याने प्रवास करणाऱ्यांची अचडण जैसे थेच असल्याचे पहावयास मिळत आहे.


पुर्णा तालुक्यात सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी तर भरपुर आहेत परंतु जनतेच्या प्रश्नांसाठी,अडचणीसाठी कुणालाही वेळ नाही. यंदा आपण स्वातंत्र्याचे ७५ वे अमृत महोत्सवी वर्ष मोठया थाटामाटात साजरे करण्यात आले स्वातंत्र्य मिळुन ७५ वर्ष होऊन ही झोपेत असणाऱ्या जनतेला त्यांचे हक्क व अधिकारांची माहिती नसल्यामुळे ज्या लोकांना या जनतेने निवडून दिले त्यांनाही याबद्दल काहीच देणे घेणे नाही. सदरील रस्तावरुन पुर्णा तालुक्यातील प्रवास करणारी फक्त सर्वसामान्य जनताच नाही, तर तालुक्यातील जिल्हाभर गाजलेले नावाजलेले नेते, लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी सर्वच या भुयारी मार्गावरून प्रवास करतात. परंतु कुणालाही याबद्दल यत्किंचितही जनाची नाही तर मनाची देखील लाज वाटत नाही. आता कोणी तरी या भुयारी मार्गाच्या प्रश्नावर निवेदन देणार अन् त्या निवेदनाच्या आधारे पत्रकार मंडळी बातम्या देखील प्रकाशित करणार यानंतर प्रशासनही आपण किती जागृत आहोत हे दाखवण्यासाठी निवेदनाची तात्पुरत्या स्वरूपात दखल घेऊन साचलेले पाणी गाळ काढुन रस्ता मोकळा करुन देणार, हे पाहुन जनसामान्यांसह लोकप्रतिनिधी राजकीय पक्ष पदाधिकारी यांच्यासह सर्वच पुन्हा एकदा प्रश्न सुटला बुवा एकदाचा म्हणून शांत बसणार ? मग पुन्हा एकदा पाऊस... पुन्हा एकदा निवेदन...पुन्हा एकदा बातम्या... मग पुन्हा एकदा जागृत प्रशासनही थातुरमातुर दुरुस्ती करणार...परंतु माझी पुर्णा व माझ्या पुर्णेची जनतेच्या समस्या...पुर्णेचे अकार्यक्षम संधीसाधू लोकप्रतिनिधी व पुर्णेचे ढिसाळ प्रशासन....कधीच बदलणार नाही......काय ही शोकांतिका.....,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या