💥पुर्णेतील रिल्याबल ॲग्रो फूड्स कंपनीच्या नावावर चालणाऱ्या कत्तल खान्यातील साठ कामगाराची थकीत वेतन न देता हाकालपट्टी ?


💥मागील ३ दिवसा पासुन उपवासी कामगार एक नंबर प्लेटफॉर्म च्या  बाहेर पगारीच्या प्रतिक्षेत💥

पूर्णा (दि.१७ सप्टेंबर) : - पुर्णा येथील कानडखेड शिवारात असलेल्या रिल्याबल ॲग्रो फूड्स या कत्तलखाण्यात कामगारांचे शोषण करीत संबंधित कंपनी प्रशासन कामगार हक्कासह कामगार कायद्याच्या नियमांचे उल्लघंन करीत असल्याचे निदर्शनास येत असून कामगार कयद्याचे उल्लंघन व कामगारांचे शोषण कंपनी प्रशासनासाठी नवीन नाही संबंधित कंपनी विरोधात वारावांर तक्रारी देऊन ही वरिष्ठ अधिकारी तक्रारींची दखल घेत नसल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेत या कंपनीत शासकीय नियमांचे उल्लघंन करीत काम चालु असल्याचे दिसत असून असाच एक गंभीर प्रकार समोर आला आहे.


आसाम राज्यातील पंचरूम मध्ये काम करणाऱ्या ६० कामगारांनी त्यांच्या एक महिन्याच्या थकीत पगारीची मागणी केली असता आज रात्रीच काम करा उद्या पगार देऊ असे आश्वासन देऊन १६ तास काम घेऊन काम संपताच सर्व कामगारांना पगार न देताच हकलून देण्यात आल हे सर्व कामगार उपवासी पोटी पूर्णा रेल्वे स्टेशनला आले पैसे नसल्या मुळे त्यांच्या गावी जाण्यासाठी टिकीट काढता येईना म्हणून पुर्णा रेल्वे स्थानकाच्या प्लेटफॉर्म एकच्या बाहेर तसेच तिन दिवस दोन रात्र काढल्या तर काही कामगार विना टिकिटच निघून गेले व राहिलेल्या कामगारांना आज दि.१७ सप्टेंबर रोजी स्थानिक सहकारी कामगारानी पैसे जमा करून त्यांना बिस्किट व तिकीटाची सोय करून त्यांच्या गावी आसाम कडे रवाना केले कंपनीच्या मनमानी हुकुमशाही कारभारच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे देण्यात आलेल्या असुन देखील संबंधित प्रशासकीय झोपेच सोग घेत आसल्याने ही कंपनी कामगाराचे शोषण करत असल्याचे गंभीर प्रकार सातत्याने उघड होत आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या