💥जिंतूर तालुक्यातील नागरी समस्या सोडवण्यासाठी लोकशाही मार्गाने आडगाव फाटा येथे रस्ता रोको आंदोलन संपन्न...!


💥जिल्हा परिषद सदस्या अरूनाताई अविनाश काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आंदोलन💥

 जिंतूर प्रतिनिधि  / बि.डी.रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील रस्ते व वीज वितरण बाबत वितरणाबाबत शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या बऱ्याच तक्रारी होत्या त्यामध्ये प्रामुख्याने जिंतूर ते औंढा राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य झालेले आहेत. यामुळे अनेक नागरिकांचा अपघाती मृत्यू झालेला होता तसेच भुस्कवडी गावाला रहदारीसाठी स्वातंत्र्यापासून रस्ता उपलब्ध नव्हता. यासाठी तेथील नागरिकांनी मागील विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला होता.तरीही शासनाने या बाबी कडे दुर्लक्ष केले होते.


त्यामुळे जिल्हा परिषद सदस्या अरूनाताई अविनाश काळे यांच्या पत्रावर आरूना अविनाश काळे व  अविनाश मुंजाजी काळे,राजेंद्र मल्हारराव नागरे यांनी दिनांक 7 सप्टेंबर 2022रोजी मा. जिल्हाधिकारी परभणी, महवितरण अधिकारी, व राष्ट्रीय महामर्ग कार्यालय येथे निवेदन देवून  जिंतूर ते औंढा राष्ट्रीय महामार्गावर झालेले खड्डे तत्काळ दुरुस्त करणे,आडगाव बाजार व इटोली सबस्टेशन येथे 5 एम व्ही चे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात यावे, भुसकवडी फाटा ते भुसकवडी रस्ता जिल्हा परिषदेच्या सण 2022-23 नियोजन आरखड्यात मंजूर करणे, इटोळी - मांडवा - डोंगरतळा- घेवंडा या फिडर वर अतिरिक्त भार विभाजन करून स्वतंत्र फिडर बसवणे, इटोली- गडाढव्हण - मोहखेड - सोरजा  फिडर ची तत्काळ दुरुस्ती करून मंजूर असलेले फिडर चे काम तत्काळ पूर्ण करणे, इटोली - दाभा - दिग्रस फिडर ची तत्काळ दुरुस्ती करून स्वतंत्र फिडर करणे,आडगाव - टाकळखोपा- श्रीरामवाडी- भुसकवडी फिडर ची दुरुस्ती करून स्वतंत्र फिडर बसवणे,आडगाव - टाकलखोपा - श्रीरामवाडी हा रस्ता जिल्हा परिषदे मार्फत मंजूर करणे, मौजे देवसडी येथे फलाटवाडी कडे जाणारा रस्ता खुला करणे  या मागण्या संदर्भात 17 सप्टेंबर रोजी पर्यंत मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल अशी मागणी केलेली होती त्या अनुषंगाने दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी आडगाव फाटा येथे  सकाळी 10ते 12 वाजे पर्यंत सुमारे दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

       या मध्ये कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग नांदेड, यांनी भेट देऊन जिंतूर ते औंढा महामार्गावरील खड्डे येत्या चार दिवसात दुरुस्त करून देण्याचे आश्वासन दिले.त्याच बरोबर महावितरण चे उपकार्यकारी अभियंता यांनी आंदोलनास भेट देऊन आडगाव बाजार व इटोली म्हसोबा येथे 5 एम व्हीं चे ट्रान्सफॉर्मर बाबतीत अंदाजपत्रक तयार करून डी पी आर मंजूर करण्यात आला असून लवकरच तो प्रश्न निकाली निघणार असल्याचे आश्वासन लेखी स्वरूपात देवून फिडर च्या दुरुस्ती साठी इजेंसी नेमून लवकरच काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे, तसेच भुसकवडी  व आडगाव - टाकळखोपा - श्रीराम वाडी रस्त्या संदर्भात जिल्हापरिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर साहेबांनी लेखी दिले.एकंदरीत सर्वच या रस्ता रोको आंदोलनाला यश मिळाले असल्याने नागरिकांत व शेतकरी यांच्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या आंदोलनात काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत, जिल्हा परिषद सदस्या अरुनाताई काळे, राजेंद्र नागरे,अविनाश काळे,राम घुगे, कृष्णा दुधगावकर, पवन भालेराव, जगनराव काळे, महेश सांगळे, तहेसिन देशमुख, माऊली नागरे, निवास घुगे, गोविंद खंडागळे, बालाजी खंडागळे, मिलिंद डोके ,नाना निकाळजे, बाबाराव चिलगर ,मारुती घुगे, विश्वनाथ घुगे ,शिवाजी काळे,विष्णू काळे, रहीम कुरेशी, सचिन कुटे, विकास शिंदे, नितीन पाटील व पुप्पु पाटील, रखमाजी खिल्लारे ,रुक्मिणी बाई ईंगोले ,रामकिसन नागरे ,बबनराव कवडे, बाबुराव शेळके ,कैलास कवडे  श्रावण खिल्लारे ,जयकुमार खिल्लारे, बाळू खंडागळे,प्रकाश राऊत आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या