💥गंगाखेडात तुळजाभवानी नवरात्र महोत्सवाच्या वतीने शुक्रवार दि.३० सप्टेंबर रोजी किर्तन सोहळा.....!


💥प्रसिद्ध किर्तनकार रामायणाचार्य हभप.रोहिदास महाराज मस्के बामणीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन💥

गंगाखेड प्रतिनिधी 

शहरातील रंगार गल्ली भागात तुळजाभवानी नवरात्र उत्सव कमिटीच्या वतीने शुक्रवारी प्रसिद्ध किर्तनकार रामायणाचार्य हभप. रोहिदास महाराज मस्के बामणीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.


जुन्या शहरातील पोस्ट ऑफिसच्या शेजारी तुळजाभवानी नवरात्र महोत्सवानिमित्त देवीची स्थापना करण्यात आली आहे. या गल्लीतील युवकांच्या वतीने आदर्श नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने परभणी जिल्ह्यातील प्रसिद्ध कीर्तनकार रामायणाचार्य रोहिदास महाराज मस्के बामणीकर यांच्या कीर्तन सोहळ्याच आयोजन करण्यात आले आहे.30 सप्टेंबर शुक्रवारी सकाळी 9 ते 11 या वेळात कीर्तन होणार आहे. आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर या कीर्तनाचे यजमान असणार आहेत.  या कीर्तन व महाप्रसाद सोहळ्याचा आनंद घेण्याचे आवाहन तुळजाभवानी नवरात्र महोत्सवच्या वतीने करण्यात आले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या