💥चारठाणा येथे विविध गणेश मंडळाला एटीएस,बिडीडीएसचे प्रात्यक्षिक व पाहणी....!


💥प्रत्येक सदस्यांनी चोख बंदोबस्त तैनात ठेवावा,मुर्ती सुरक्षा करावीत अश्या दिल्या सुचना💥

चारठाणा (प्रतिनिधी) :- जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे शनिवार ३ सप्टेंबर शनिवार रोजी परभणी पोलीसांच्या एटीएस व बिडीडीएस पथकाने येथील अनेक गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बीडीडीएस पथकाचे पोनि संजय करनुर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की,आपल्या शहरात अज्ञात वस्तुला ,बॅगला हात लावु नयेत,तसेच आपल्या गावात शहरात एखादा अनोळखी व्यक्ती निदर्शनास आल्यास पोलीस माहीती द्यावी, आपण आपल्या गणेश मंडळाची  प्रत्येक सदस्यांनी चोख बंदोबस्त तैनात ठेवावा,मुर्ती सुरक्षा करावीत तसेच यावेळी बाॅम संदर्भात श्वान पथकाने विविध प्रात्यक्षिक करून दाखवले केले. या प्रसंगी शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी देवून मार्गदर्शन केले.

यावेळी बीडीडीएस पथकाचे पोनि संजय करनुर,पो नाईक शेख ईमरान, पोना ईनायत खाॅन,पोशि संतोष मांडे, प्रेम राठोड,व एटीएस पथकातील ए. आर. पठाण, जावेद खान, भारत नलावडे,प्रवीण दिपक व  चारठाणा पोलीस ठाण्याचे डिएसबीचे डी.आर झाडे व दैनिक सामना वार्ताहार एकनाथ आवचार व गणेश मंडळाचे अध्यक्ष सह पदाधिकारी  संदिप पांचाळ, दत्ता कटारे,तुषार तोडकर, कुलदीप पाचाळ,राहुल राऊत,अभिषेक  स्वामी,,वैभव स्वामी, यांच्यासह येथील परिसरातील अनेक गणेश मंडळाचे अध्यक्ष सह पदाधिकारी व आदी मान्यवर उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या