💥राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अमृत महोत्सवी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण...!


💥मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले असून ते कार्यक्रमाला उपस्थित राहणार💥 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांची मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सव समितीच्या वतीने शिष्टमंडळासह भेट घेऊन अमृत महोत्सवी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त १६ सप्टेंबर २०२२ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे साजऱ्या होणाऱ्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन - अमृत महोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत समितीच्या वतीने निमंत्रण देऊन आयोजित करण्यात आलेल्या विभागीय परिषदेला उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षात विविध कार्यक्रम राबवून सरकारने मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढावा यासाठीही पाठपुरावा सुरु आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले असून ते कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे अमृत महोत्सव समितीच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे या भेटण्यास गेलेल्या शिष्टमंडळातील ॲड.जी.आर.देशमुख,सुभाषराव जावळे,रामेश्वर शिंदे,ॲड.यशवंत कसबे यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी सांगितले असून यावेळी आमदार अभिमन्यू पवार, आमदार श्री रमेशअप्पा कराड,आमदार श्री ज्ञानराजजी चौगुले आदींची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या