💥रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मानव मुक्ती मिशनचे जिल्हाधिकारी यांना निवेदन....!


💥निवेदनाद्वारे बोरी तांडा-वर्णा-निवळी (बु.) रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी💥

जिंतूर (दि.१३ सप्टेंबर) - जिंतूर तालुक्यातील बोरी तांडा-वर्णा-निवळी (बु.) येथे आज मंगळवार दि.१३ सप्टेंबर रोजी बोरी तांडा-वर्णा-निवळी (बु.) या १० किमी रोड पैकी ७ किमी रोडचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत चालू आहे सदर रस्त्याचे काम बोरीच्या शेतकऱ्याने अडविल्या बद्दल तसेच काम झालेल्या रोडवर राहिलेले डांबराचे थर टाकणे आणि रोडच्या साईड पट्ट्या भरणे व बोरी तांडा - वर्णा- निवळी (बु.) ता. जिंतूर जि. परभणी या १० किमी रोड़ पैकी राहिलेल्या ३ किमी रोडचे काम २० वर्षांपूर्वी प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेत झालेले आहे तरी तो रोड पूर्णपणे उखळला आहे. त्यास मंजुरी देणे संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 

या वेळी रामप्रसाद अंभुरे, नितीन सावंत, अझहर शेख, अजित कदम, भारत पवार, वैभव आंभूरे, अजिंक्य भोसले, पवन खिश्ते, सुनील खिस्ते, गुंजाभाऊ अंभुरें आदींची उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या