💥परभणी-संबर रस्त्यावरील मटकऱ्हाळा ते संबर रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करा...!


💥प्रहार जनशक्ती पक्षाचा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा💥


परभणी (दि.१२ सप्टेंबर)  - तालुक्यातील परभणी - संबर रस्त्यावरील मटकऱ्हाळा ते संबर या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असुन सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र याकडे अजिबात लक्ष देत नाही. परभणी ते संबर या रस्त्याला पुढे जोडण्यात आलेल्या पिंपळगाव टोंग, देवठाणा व सावंगी खुर्द या गावातील गावाकऱ्यांना परभणीला येण्यासाठी या रस्त्याचा वापर करावा लागतो या रस्त्याला पर्यायी रस्ता नसल्याने व अत्यंत दुरावस्था झालेल्या या रस्त्यामुळे संबर,पिंपळगाव टोंग,देवठाणा व सावंगी खुर्द गावातील नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना अतोनात त्रास सहन करावा लागतो.


संबंधित रस्त्यामध्ये दोन ते तीन फुटांपर्यंतचे खड्डे पडलेले असल्याने या खड्डयामधुन रस्ता शोधणे अवघड आहे. संबर, पिंपळगाव टोंग, देवठाणा व सावंगी खुर्द गावात एखादा आजारी रुग्ण असेल तर त्याला परभणी येथे उपचारासाठी आनने शक्यच नाही शिवाय परभणी किंवा इतर ठिकाणी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील या रस्त्याचा प्रचंड त्रास आहे. यामुळे अनेकांना आपले शिक्षण पण सोडुन द्यावे लागले हे अत्यंत गंभीर बाब आहे. परभणी संबर रस्त्यावरील मटकऱ्हाळा ते संबर रस्त्याची अक्षरशः चाळणी होईपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग झोपा काढतोय की काय का ? प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित रस्त्यांची दुरुस्ती येत्या सहा दिवसांच्या आत करण्यात यावी अश्या मागणी चे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्ट मंडळा सह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.पाटील यांची भेट घेउन त्यांना देण्यात आले.


सहा दिवसात काम सुरु न झाल्यास सोमवार दि. १९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने संबर, पिंपळगाव टोंग, देवठाणा व सावंगी खुर्द या गावातील ग्रामस्थाच्या सहभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल व आंदोलनाच्यावेळी उदभावणाऱ्या कायदा व सुव्यस्थेच्या प्रश्नाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असेल असे ही या निवेदनात म्हटले आहे.


निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हाप्रमुख गजानन चोपडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख माधवीताई धोडके, तालुका प्रमुख ज्ञानोबा, शहर प्रमुख धर्मेंद्र तुपसमुद्रे, महिला आघाडी शहर प्रमुख आरतीताइ जुंबडे, महिला आघाडी उप शहर प्रमुख महानंदाताई माने, शहर चिटणीस वैभव संघई, उद्धव गरुड, सय्यद युनूस, शेख बशीर, सचिन शेरे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या