💥अरे मनुष्यरुपी आसूरांनो सांगा ना आम्ही जगायच की मरायच...?



💥अरे कुठवर यांचा प्रचंड मानसिक त्रास सहन करायच ? अरे नालायकांनो सांगा ना आम्ही जगायच की मरायच...?💥

राजकीय दडपशाही...प्रशासकीय हुकूमशाही अन् समाजकंठक माफिया/गुंडांची दहशत...सर्वांचेच अर्थपुर्ण एकमत...अरे मग सांगा ना आम्ही जगायच की मरायच ?

चुन्याची डब्बी...गुटख्याची थकबाकी...दुचाकी/चारचाकीचा धक्का अन् रात्रंदिवस मद्यपी तळीरामांचा धुमाकूळ पक्का ? बेईमान राजकारणी भ्रष्टाचारी अधिकारी अन्  गुंड/माफियांचा प्रत्येकवेळी एकमेकांना वाचवण्याचा विचार पक्का..

राजकीय दडपशाही...प्रशासकीय हुकूमशाही अन् समाजकंठक माफिया/गुंड...सर्वच इथे एकमेकांचे भाई भाई...निरपराध कार्यकर्त्यांचा बळी अन् हरामखोरांची फौज जनसामान्यांना छळी...अरे मग आम्ही सर्वसामान्य जनता व्यापाऱ्यांनी सांगा ना शेवटी जगायच की मरायच ?

राजकीय दहशतवाद्यांतील वर्चस्वासाठी आपसी वाद अन् मद्यपी तळीरामांच्या संगतीला बोटकरी जमात अरे कुठवर यांचा प्रचंड मानसिक त्रास सहन करायच ? अरे नालायकांनो सांगा ना आम्ही जगायच की मरायच...?

राजकीय दहशतवाद्यांच्या दहशतीला आम्ही सत्याच्या पाठीराख्यांनी शेवटी कुठवर बळी पडायच अन् जनहीताशी बांधिलकी जोपासण्याच्या नादात शेवटी स्वतःसह स्वतःच्या कुटुंबाच्या अपेक्षांची निर्घृण हत्या कुठवर करायच ? अरे मनुष्यरुपी आसूरांनो सांगा ना आम्ही जगायच की मरायच...?

- चौधरी दिनेश (रणजीत)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या