💥परभणी जिल्ह्यातील सेलू येथील अल्पवयीन मुलीच्या झालेल्या बलात्कार प्रकरणातील दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात...!


💥पोलिस प्रशासनाने तपासाची यशस्वी सुत्र हलवत ३६ तासात केले दोन्ही नराधमांना अटक💥

परभणी (दि.०७ सप्टेंबर) : जिल्ह्यातील सेलू तालुक्याल्या कोक शिवारात झालेल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात पोलिस प्रशासनाने यशस्वीपणे तपासाची सुत्र हलवत सिसीटीव्ही पुटेजच्या आधारे ३६ तासाच्या आत दोन्ही बलात्कारी नराधम आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली.

सेलू पोलिस स्थानकात काल मंगळवार दि.०६ सप्टेंबर २०२२ रोजी एक तक्रार दाखल करण्यात आली या तक्रारीत असे नमूद करण्यात आले की एका अल्पवयीन मुलीस व तीचे अल्पवयीन भावास जिवे मारण्याची धमकी देवून जबरदस्तीने दुचाकीवर बसवून पळवून नेले. भावास मारहाण करीत ढकलून दिले व मूलीवर अत्याचार केला असे पिडीत अल्पवयीन बालिकेच्या आईने तक्रारीद्वारे नमूद केले.

                पिडीत मुलगी व तीचा मावस भाऊ हे त्यांचे शेतातून महालक्ष्मी सणानिमीत्त हराळी गवत सेलू येथे घेवून जात असतांना सेलू शहरालगतच्या परिसरातील खाणीचे मारोती मंदीर परिसरात दर्शन करून बसले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन आरोपींनी पिडीत मुलगी व तीच्या मावस भावास जिवे मारण्याची धमकी देवून दुचाकीवर बसविले. त्यानंतर आरोपींनी दोघांना बोरी परिसराकडे नेले. भावास मारहाण करुन गाडीवरुन ढकलून दिले. तर मुलीवर अत्याचार केले.

                 मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे या प्रकरणी सेलू पोलीस स्थानकात दोन अज्ञात आरोपीं विरोधात गुरनं. ३७१/२०२२ अंतर्गत भादंवि.कलम ३६३,३६६ अ, ३७६ (२) (आय), ३७६ (२) (जे), ३७६ डी,५०६,३४ तथा बालकांचे लैंगीक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,८,१२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हा नोंद झाल्यापासून पोलीस अधीक्षक जयंत मीना, अपर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा परभणी शहर उप विभागीय पोलीस अधिकारी अविनाश कुमार, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण, पोलिस निरीक्षक संजय करणूर, सेलू पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गाडेवाड, जिंतूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दंतूलवार, बोरी ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मुळे, चारठाणा ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक साईनाथ पुय्यड, पोउपनि नागनाथ तुकडे, पोउपनि व्यंकट कुसमे हे सर्व अधिकारी स्वत: व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे तीन पथक, सायबर सेलचे एक पथक व सेलू, जिंतूर, बोरी, बामणी चारठाणा  पोलीस ठाण्याचे प्रत्येकी एक व वाहतूक शाखेचे एक पथक असे १० पथके स्थापन करण्यात आली.

                या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज मिळविण्यासह आरोपीचा मार्ग ट्रेस करणे व आरोपी निष्पन्न करणे याकरीता पोलीसांनी आरोपींचे उपलब्ध झालेले फोटो, फुटेज यांचा तांत्रीक अभ्यास केला. गोपनीय सुत्रधारांकडून आरोपींची माहिती मिळविण्यास सुरुवात केली. वरिष्ठ अधिकार्‍यांनी जिंतूर, सेलू, बोरी परिसरातील हॉटेल्स, ढाबे, विविध अस्थापना, आरोपींचे लपण्याचे संभावित ठिकाणे परिसर या ठिकाणी जावून चौकशी केली. आरोपी संदर्भातल्या माहितीची पडताळणी केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा नेमका ठावठिकाणा काढला.

                दरम्यानच्या काळात आरोपींना याचा सुगावा लागल्याने या प्रकरणातून स्वत:चा बचाव करण्यासाठी ते पळ काढण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर आरोपींना ताब्यात घेण्यासाठी सेलू, जिंतूर, बोरी व चारठाणा परिसरात सापळा लावण्यात आला. बुधवारी पहाटेच्या सुमारास गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह आरोपी फरार होत असल्याची माहिती पोलीसांना कळताच पोलीसांनी तात्काळ कार्यवाही करीत संबंधित आरोपींना त्यांच्या गावालगत पाठलाग करून ताब्यात घेतले. यावेळी घेतलेल्या झडतीत गुन्ह्यात वापर केलेल्या दुचाकीसह अन्य महत्वाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

               दरम्यान, गुन्ह्याचा पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी अविनाश कुमार हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या