💥ज्येष्ठ धम्म उपासिका भागाबाई मारोती बगाटे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन....!


💥त्यांच्या पश्चात दोन मुले आणि तीन मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे💥

पूर्णा (दि.13 सप्टेंबर) - शिक्षक कॉलनी पूर्णा येथील बबन बगाटे सर यांच्या आई भागाबाई मारुती बगाटे यांचे वयाच्या 95 व्या वर्षी वृद्धापकाळाने सकाळी पाच वाजता दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले आणि तीन मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील लोहरा हे त्याचे मुळगाव . अतिशय प्रतिकूल परिस्थिती मधून त्यांनी आपल्या मुला-मुलींना शिक्षित व संस्कारीत केले. इंदिरा गांधी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक बबन बगाटे यांच्या त्या आई होत्या.

त्यांचा अंत्यविधी सकाळी अकरा वाजता शोकाकुल वातावरणामध्ये बौद्ध स्मशानभूमी येथे पार पडला यावेळी माजी नगराध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे   हिंगोली चे माजी नगराध्यक्ष सदाशिव सूर्य तळ पोलीस निरीक्षक गंगाधर गायकवाड डॉक्टर गौतम गायकवाड मुख्याध्यापक संभाजी खंदारे प्राध्यापक दीपक कदम प्राचार्य डॉक्टर केशव जोंधळे ज्येष्ठ पत्रकार विजय बगाटे भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे त्याचप्रमाणे सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या