💥मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -देंवेद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ; राज्यात लवकरच पोलिसांची २० हजार पदे भरणार....!


💥पोलीस भरतीबाबत देंवेद्र फडणवीसांची मोठी घोषणा : २० हजार पदांसाठी लवकरच जाहिरात निघणार💥

✍️ मोहन चौकेकर

मुंबई :- गृहविभागाची महत्त्वपूर्ण बैठक आज उपमुख्यमंत्री व गॢहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली, तसेच काही निर्णय देखील घेण्यात आले आहे. तसेच राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने तरुणांच्या दृष्टीने एक मोठा निर्णय घेतला आहे. मागील दोन वर्षापासून कोविड व अन्य कारणांमुळे रखडलेली पोलीस भरती आता राज्य सरकारकडून केली जाणार आहे. राज्यात आता तब्बल २० हजार पोलिसांची पदे भरली जाणार असल्याची माहिती आज सोमवारी उपमुख्यमंत्री व गॢहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: प्रसार माध्यमांना दिली.

एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मी घेतलेला आहे. तो म्हणजे दोन वर्षांची पोलीस भरती आता आम्ही हाती घेत आहोत. साधारणपणे पोलिसांची २० हजार पदे भरण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे." असं उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे.याचबरोबर "या संदर्भातील कार्यवाही आम्ही लवकरात लवकर करू. जवळपास साडेसात ते आठ हजार पदांची एक जाहिरात निघालेली आहे.अजून १२ हजार पदांची एक जाहिरात ही लवकरच आम्ही काढणार आहोत. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर पोलीस भरती आम्ही करणार आहोत. मला असं वाटतं यामुळे पोलीस दलाला निश्चतपणे फायदा होईल." अशीही माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या राज्यभरातील लाखो तरूणांसाठी निश्चितच दिलासादायक ठरणार आहे. तर या अगोदर राज्यातील गृह विभागात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ ऑगस्ट रोजी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली होती.

राज्यातील विविध शहरांमध्ये पोलीस विभागात मनुष्य बळ कमी पडत आहे. मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन लवकरच ७ हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आणखी सात हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत." असं देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी सांगितलं होतं.

* सायबर सिक्युरिटीबाबत आढावा ः-

सायबर सिक्युरिटीबाबतही या बैठकीत आढावा घेण्यात आला आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेता याबाबत चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याबाबत पावलं उचलली जाणार आहेत. सायबर गुन्ह्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान होत आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प उभारण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रकल्पासाठी कोणताही भूखंड दिलेला नव्हता. प्रकल्प गुजरातला जात असताना आम्ही त्यांना भेटलो. ज्या काही हालचाली झाल्या त्या आमच्या सरकारच्या काळात झाल्या आहेत. सध्या विरोधक आंदोलन करुन नौटंकी करत आहेत. आम्ही जास्तीत जास्त गुंतवणूक आणून त्यांना जशास तसं उत्तर देऊ, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

सध्या नवरात्रीत गरब्यासाठी दोन दिवस आम्ही १२ वाजेपर्यंत दिले आहेत. आणखी एक दिवस वाढवून द्या. याबाबत गृहविभागाकडून एक प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.....                                                  

✍️मोहन चौकेकर*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या