💥राजमुद्रा नागरी सहकारी पतसंस्थेची पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा थाटात संपन्न....!


💥सुंदरलाल सावजी बँकेच्या माध्यमातून त्यांना आलेले अनुभव प्रमुख पाहुणे प्रशांत सावजी यांनी सभागृहासमोर ठेवले💥

संपन्न राजमुद्रा नागरी सहकारी पतसंस्थेच्या पाचव्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉक्टर केदार खटिंग, प्रमुख पाहुणे प्रशांत सावजी कळमकर साहेब ,(अध्यक्ष सुंदरलाल सावजी नागरी सहकारी बँक) पतसंस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर रामेश्वर नाईक, सचिव श्री नितीन लोहट, सहसचिव श्री विठ्ठल भुसारे सर, सर्व सन्माननीय संचालक मंडळ, ठेवीदार सभासद व इतर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदरणीय कळमकर साहेबांनी नागरी बँक, पतसंस्था यांचे समाजातील महत्त्वाचे स्थान विशद केले. पतसंस्था संचालन करत असताना घ्यावयाची काळजी, कर्जदाराचे हित, ठेवीदाराचे हित व एकूणच सहकाराच्या माध्यमातून सामाजिक आर्थिक प्रगती साधण्यासाठी ची मार्गदर्शक तत्वे सभागृहाला सांगितली .सुंदरलाल सावजी बँकेच्या माध्यमातून त्यांना आलेले अनुभव सभागृहासमोर ठेवले.         

 संस्थेचे सहसचिव विठ्ठल भुसारे यांनी ठेवीदार कर्जदार व पतसंस्थेचे कार्य कुशल कर्मचारी यांच्यामधील आपसातील संबंध व सौहार्द कसे टिकून राहील व संस्थेच्या विकासाच्या बाबतीत सातत्याने नवनवीन प्रयोग करत संस्थेची व सभासदांची आर्थिक उन्नती कशी होईल यासाठी विशेष मार्गदर्शन केले . संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर रामेश्वर नाईक यांनी संस्था व आर्थिक नियोजन, मायक्रो फायनान्स व सामान्य घटकातील सभासदांसाठी पतसंस्था हे एक आशेचा किरण आहे व त्यातून होणारे व्यवहार हे आर्थिक साक्षरतेसाठी उपयुक्त आहेत व त्यातूनच समाजातील मागासलेल्या घटकांना आर्थिक बळ देऊन त्यांना प्रगतीची संधी देण्यासाठी पतसंस्थेचे महत्त्व विशद केले, त्याचबरोबर हे व्यवहार करत असताना घ्यावयाची काळजी यावरही लक्ष केंद्रित केले. संस्थेचे सचिव, श्री नितीन लोहट यांनी संस्थेचा पाच वर्षातील कार्याचा आढावा घेतला ,संस्था स्थापनेपासून ते आजतागायत संस्थेने केलेली लोकोपयोगी कामांची आठवण सभासदांना व सभागृहाला करून दिली. त्याचबरोबर सामान्य आर्थिक परिस्थितीतील सभासद व विशेष करून ग्रामीण सभासदांना सावकारी विळख्यातून सोडवण्यासाठी पतसंस्था ही किती महत्त्वाची आहे यावरही लक्ष केंद्रित केले. येणाऱ्या काळामध्ये संस्थेला अत्याधुनिक स्वरूपातून सेवा देण्यासाठी तयार करण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला. त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये व गावांमध्ये पतसंस्थेच्या शाखा विस्तारित करून येणाऱ्या काळामध्ये सामान्य माणसापर्यंत संस्थेचे आर्थिक धोरण पोहोचण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला. त्याचबरोबर संस्थेचा सातत्याने चढता आलेख व दूरदृष्टी यावरही प्रकाश टाकला. सभेचे सूत्रसंचालन संस्थेचे व्यवस्थापक श्रीयुत पिसुरे साहेब यांनी केले. एकूणच सभा अत्यंत खेळीमेळीच्या व आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न झाली .सभेच्या शेवटी अल्पोपहार व चहापाणी करून सभेची सांगता झाली. मोठ्या प्रमाणामध्ये सभासद उपस्थित असल्याने वातावरणामध्ये उत्साह दिसून आला. सभेचे वैशिष्ट्य म्हणजे, काही निवडक कर्जदार, ठेवीदार व इतर सहकाऱ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष ,सचिव व सहसचिव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .व त्यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या